सिरसे नुकसानग्रस्त कुटुंबाला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:28 IST2021-08-21T04:28:32+5:302021-08-21T04:28:32+5:30
सुशील पाटील-कौलवकर युवा मंच यांच्या वतीने सिरसे (ता.राधानगरी) येथे घर पडून नुकसानग्रस्त झालेल्या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून दिलासा ...

सिरसे नुकसानग्रस्त कुटुंबाला मदत
सुशील पाटील-कौलवकर युवा मंच यांच्या वतीने सिरसे (ता.राधानगरी) येथे घर पडून नुकसानग्रस्त झालेल्या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून दिलासा दिला आहे.
सिरसे येथील वसंत कांबळे यांच्या घराचे अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन पडले. त्यामुळे कांबळे कुटुंबीय रस्त्यावर येण्याची वेळ आली होती. मात्र सुशील पाटील यांच्या दातृत्वाने त्यांना सावरण्यास मदत झाली.
यावेळी वसंत कांबळे, शिवाजी कांबळे, रंजना कांबळे, सरपंच सुभाष पाटील, भिकाजी पाटील, प्रल्हाद पाटील, महादेव कांबळे, बापुसो पाटील,लहू पाटील, बाळासो पाटील आदी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळी :
सिरसे (ता.राधानगरी) येथील वसंत कांबळे यांच्या घराचे नुकसान झाले त्यांना मदत देताना सुशील पाटील, सुभाष पाटील, भिकाजी पाटील आदि,