सिंगलसाठी सिंगलसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:39 IST2021-05-05T04:39:45+5:302021-05-05T04:39:45+5:30
गडहिंग्लज : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील सुरेश पाटील यांना सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नतीने बढती मिळाली. १९८२ पासून ते मुंबई ...

सिंगलसाठी सिंगलसाठी
गडहिंग्लज : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील सुरेश पाटील यांना सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नतीने बढती मिळाली. १९८२ पासून ते मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. २०१३ मध्ये खात्यांतर्गत परीक्षेतील उपनिरीक्षकपदी त्यांची निवड झाली होती. ३९ वर्षांच्या सेवा काळात त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल १५० प्रशस्तिपत्रे मिळाली आहेत.
-------------------------
२) सरोळी येथे मास्कचे वाटप
गडहिंग्लज : सरोळी (ता. आजरा) येथील जय हनुमान तरुण मंडळातर्फे कोरोनाच्या मुकाबल्यासाठी घरोघरी मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. मंडळाचे सदस्य आण्णासाहेब देसाई, दत्तात्रय कुराडे, विठ्ठल पाटील, शिवाजी पोवार, भिकाजी पाटील, लक्ष्मण देसाई, नामदेव पाटील, संदीप बोड्डे, आदींनी हा उपक्रम राबविला.
-------------------------
३) परीट यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार
गडहिंग्लज : चंदगड तालुका कृषी कार्यालयातून कृषी पर्यवेक्षक पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल एल. जी. परीट यांचा तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. मंडल कृषी अधिकारी वाय. पी. पोळ यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मंडल कृषी अधिकारी ए. सी. गारडे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीराम भोगण यांनी आभार मानले.
-------------------------
४) सरोळीत १२४३ ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
गडहिंग्लज : सरोळी (ता. आजरा) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १२४३ ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये ऑक्सिजन पातळी व शरीराचे तापमान तपासण्यात आले. तसेच लसीकरणाबद्दलची माहिती घेण्यात आली.
सरपंच आकाराम देसाई, आरोग्य सेवक सचिन पाटील, ग्रामसेवक संतोष कुंभार, तलाठी अनुराधा हावळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
तपासणी पथकात विश्वास येजरे, सरिता पाटील, रेश्मा कांबळे, राजेंद्र खोराटे, शालन कांबळे, छाया कुराडे, शहाजी देसाई, मेरी डायस, आदींचा समावेश होता.
-------------------------
५) मुत्नाळमध्ये शनिवारपर्यंत कडक लॉकडाऊन
गडहिंग्लज : मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामदक्षता समितीने शनिवार (दि. ८) मे पर्यंत गावात कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
-------------------------
६) गडहिंग्लज तालुक्यातील चार शाळा दुर्गम
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील लमानवाडा-हडलगे, भोगाणेतळ-भडगाव, रामतीर्थ-महागाव, घोल वसाहत, बुगडीकट्टी या चार शाळा दुर्गम ठरल्या आहेत. प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियेतील दुर्गम शाळांच्या ७ निकषांपैकी ३ निकष पूर्ण केल्यामुळे या शाळा दुर्गम ठरवून वरिष्ठ कार्यालयाला तसा अहवाल पाठविण्यात आला आहे.
-------------------------
७) गडहिंग्लजमधील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना थकीत मानधन अदा
गडहिंग्लज : येथील समर्पित कोविड उपजिल्हा रुग्णालय आणि कोविड काळजी केंद्राकडील ३१ कर्मचाऱ्यांना थकीत मानधन अदा करण्यात आले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत या कर्मचाऱ्यांनी कंत्राटी तत्त्वावर परिचारिका, आयुष वैद्यकीय अधिकारी, लॅब व एक्स-रे टेक्निशियन, औषध निर्माता या पदावर सेवा बजावली होती. दुसऱ्या लाटेत त्यांना पुन्हा कामावर बोलावण्यात आले. परंतु, गेल्या चार महिन्यांपासून मानधन मिळालेले नव्हते. आठ दिवसांत मानधन न मिळाल्यास काम बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी 'मनसे'च्या पुढाकाराने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिला होता.