सिंगलसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:27 IST2021-07-30T04:27:06+5:302021-07-30T04:27:06+5:30
नेसरी : येथील तु. कृ. कोलेकर वरिष्ठ महाविद्यालयांतर्गत अग्रणी महाविद्यालय योजना व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व शिवराज महाविद्यालय ...

सिंगलसाठी
नेसरी :
येथील तु. कृ. कोलेकर वरिष्ठ महाविद्यालयांतर्गत अग्रणी महाविद्यालय योजना व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व शिवराज महाविद्यालय क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने 'योग आणि ताण व्यवस्थापन' या विषयावर एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा उद्या (शुक्रवार) सकाळी ११ ते १ यावेळेत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती प्र. प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर दिली. प्रा. शंकर खाडे व समुपदेशक संदीप पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.
-----------------------
२) नेसरीत शनिवारी राष्ट्रीय वेबीनार
नेसरी :
नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील टी. के. कोलेकर वरिष्ठ महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभाग व श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (३१) सकाळी ११ वाजता 'ऑनलाईन बँकिंग पद्धतीचा सार्वजनिक व सहकार क्षेत्रातील बँकांवरील प्रभाव' या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय वेबीनार आयोजित करण्यात आले आहे.
कॉमर्स अॅण्ड मॅनेजमेंट विभाग राणी चन्नम्मा विद्यापीठ, बेळगावचे अध्यक्ष डॉ. बी. एस. नावी बीजभाषक असून, बँक मॅनेजमेंट धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारा विभागप्रमुख डॉ. विजय कुंभार, शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य तथा 'रवळनाथ' संस्थापक-अध्यक्ष एम. एल. चौगुले मार्गदर्शन करणार आहेत.
---------------------------
३) गडहिंग्लजच्या हार्दिक घवाळेचे यश
गडहिंग्लज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील जागृती हायस्कूलमध्ये आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धा पार पडली. स्पर्धेत शाळेच्या हार्दिक संजय घवाळे याने प्रथम क्रमांक पटकाविला. त्याला कलाशिक्षक दत्ता लोहार यांचे मार्गदर्शन लाभले.