सिंगलसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:23 IST2021-05-19T04:23:01+5:302021-05-19T04:23:01+5:30

हलकर्णी : नंदनवाड (ता. गडहिंग्लज) येथील आदिती फौंडेशनतर्फे कोरोनामध्ये फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्यांना आशा व अंगणवाडी सेविकांसाठी पाच ...

For singles | सिंगलसाठी

सिंगलसाठी

हलकर्णी : नंदनवाड (ता. गडहिंग्लज) येथील आदिती फौंडेशनतर्फे कोरोनामध्ये फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्यांना आशा व अंगणवाडी सेविकांसाठी पाच लिटर सॅनिटायझर, मास्क व १० हजार रुपयांची औषधे दिली. यावेळी फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष दिनकर सावेकर, सचिव आनंदा वाघराळकर, सरपंच शेवंता मगदूम, उपसरपंच बाळू केसरकर, गंगाराम सावेकर, अजित केसरकर, रमेश सावेकर, आदी उपस्थित होते.

-------------------------

२) इंचनाळकर उभे करणार कोरोना केअर सेंटर

गडहिंग्लज : इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समिती यांच्या संयुक्त बैठकीत गावातील प्राथमिक शाळेत कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय झाला. सौम्य आणि लक्षणे नसणाऱ्या कोरोना रुग्णांवर या ठिकाणी उपचार करण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घाला घालण्यासाठी व गंभीर रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय व शेंद्री माळ येथील कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध व्हावेत यासाठी हा निर्णय घेतला आहे.

या कामी सरपंच उत्तम कांबळे, उपसरपंच उदय देसाई, उत्तम कांबळे, सचिन पाटील, शिवाजी राणे, अमृत पाटील, सूर्यकांत पोवार, उत्तम पाटील, विलास देशपांडे, दीपक पाटील, सचिन पोवार, आदी उपस्थित होते. ग्रामसेवक सुरेश गुरव यांनी आभार मानले.

-------------------------

३) नेसरी ग्रामपंचायतीला औषध फवारणी मशीनरी भेट

नेसरी : नेसरी (ता. गडहिंग्लज) ग्रामपंचायतीला पंचायत समिती स्तर निधीतून औषध फवारणी मशीन देण्यात आले. ग्रामपंचायतीचे सदस्य रामचंद्र परीट व कार्तिक कोलेकर यांच्या हस्ते मशिनरीचे उद्घाटन झाले. यावेळी सरपंच आशिष साखरे, उपसरपंच अमर हिडदुगी, ग्रामविकास अधिकारी पी. बी. पाटील, आदींसह सदस्य उपस्थित होते.

-------------------------

४) बेळगुंदीत पोषण आहार वाटप

गडहिंग्लज : बेळगुंदी येथे ग्रामपंचायतीकडून गरोदर व स्तनदा माता, कुपोषित मुलांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी 'कोरोना विषाणू : लक्षणे, उपाय व घ्यावयाची काळजी' याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच तानाजी रानगे, उपसरपंच दीपिका पाडले, मिलिंद मगदूम, शामला सनवक्के यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका उपस्थित होत्या.

-------------------------

५) मुमेवाडीतील कोविड सेंटरला दीड लाखाची मदत

गडहिंग्लज : मुमेवाडी (ता. आजरा) येथे जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश आपटे यांनी सुरू केलेल्या ४० बेडच्या कोविड सेंटरला उत्तूरमधील अवधूत भजनी मंडळ, इंदिरानगर गणेशोत्सव मंडळ व ग्रामस्थांनी तब्बल एक लाख ४५ हजारांची आर्थिक मदत दिली.

आपटे यांनी मुमेवाडी येथील महापारेषण कंपनीच्या इमारतीत हे सेंटर सुरू केले आहे.

रुग्णांना उपचार देण्याबरोबरच चहा, नाष्टा, जेवणही फौंडेशनकडूनच दिले जाते.

Web Title: For singles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.