सिंगलसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:47 IST2020-12-17T04:47:02+5:302020-12-17T04:47:02+5:30

कोवाड : किणी (ता. चंदगड) येथे १ जानेवारी २०२१ रोजी साजरी होणारी झुटिंगबाबा देवस्थान यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली ...

For singles | सिंगलसाठी

सिंगलसाठी

कोवाड : किणी (ता. चंदगड) येथे १ जानेवारी २०२१ रोजी साजरी होणारी झुटिंगबाबा देवस्थान यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. ग्रामपंचायत, कोरोना दक्षिता समिती, तंटामुक्त समिती व देवस्थान समिती यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

-------------------------------

२) अरळगुंडीत विठ्ठलनाम सप्ताह

हलकर्णी : अरळगुंडी (ता. गडहिंग्लज) येथे २४ ते २६ डिसेंबरअखेर श्री विठ्ठलनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार (दि. २४) हनुमंतरायास महाअभिषेक, गाथापूजन, ध्वजपूजन, प्रतिमापूजन, काकडआरती, ज्ञानेश्वरी गाथा पारायण, प्रवचन होईल.

सप्ताहकाळात काळात वासकर महाराज (पंढरपूर), मारुती घोरपडे (नांगनूर), किरण खटावकर (संकेश्वर) यांचे प्रवचन; तर सचिन आळतेकर (आळते), महेश भादवणकर (देवर्डे) यांचे कीर्तन, मारुती पोवार (अंकली) याचे काल्याचे कीर्तन होईल.

Web Title: For singles