सिंगलसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST2021-02-09T04:26:11+5:302021-02-09T04:26:11+5:30
गडहिंग्लज : औरनाळ येथील पार्वती हायस्कूलमध्ये मराठी विज्ञान परिषदेतर्फे विद्यार्थ्यांसाठी विज्ञान खेळणी कार्यक्रम पार पडला. राजन कवठेकर यांनी गणित ...

सिंगलसाठी
गडहिंग्लज : औरनाळ येथील पार्वती हायस्कूलमध्ये मराठी विज्ञान परिषदेतर्फे विद्यार्थ्यांसाठी विज्ञान खेळणी कार्यक्रम पार पडला. राजन कवठेकर यांनी गणित व विज्ञानातील खेळणी मुलांकडून तयार करून घेतले. यावेळी उमेश सावंत, मुख्याध्यापक श्रीरंग तांबे, एस. डी. पद्मन्नावर, एस. के. नेर्ले, बी. जी. कोट, वैशाली रेपाळ आदी उपस्थित होते.
---------------------------
२) पार्वती हायस्कूलमध्ये आरोग्य तपासणी
गडहिंग्लज : औरनाळ येथील पार्वती हायस्कूलमध्ये उपजिल्हा रूग्णालयालयातर्फे डॉ. रमेश रेडेकर यांनी ११२ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. यावेळी मुख्याध्यापक श्रीरंग तांबे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
---------------------------
३) हसूरचंपू येथे आरोग्य शिबीर
गडहिंग्लज : हसूरचंपू येथे आयोजित शिबीरात पंचक्रोशीतील रूग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. यावेळी माजी सभापती जयश्री तेली, प्रभावती बागी, पद्मा तोडकर, संतोष तेली, सचिन शेंडगे, भिमा दुंडगे, किरण तोडकर, चैतन्य शहा आदी उपस्थित होते. उमेश साठे यांनी आभार मानले.
---------------------------
४) भादवणची महालक्ष्मी यात्रा रद्द
उत्तूर : भादवण (ता. आजरा) येथे १२ फेब्रुवारीला होणारी दरवर्षीची श्री महालक्ष्मी यात्रा कोरोनामुळे रद्द करण्याचा निर्णय यात्रा कमिटी, तहसिलदार, पोलिस प्रशासन व मानकºयांच्या बैठकीत झाला.
मानकरी, देवस्थान कमिटी सदस्य व माहेरवासिणींच्या उपस्थितीत साधेपणाने देवीची पूजा होईल. शुक्रवार ते रविवारअखेर बाहेरील पै-पाहुणे, फेरीवाले यांना गावात येण्यास मनाई करण्यात आली आहे.