सिंगलसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:05 IST2021-02-05T07:05:18+5:302021-02-05T07:05:18+5:30
गडहिंग्लज : चन्नेकुप्पी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्यात आले. प्राचार्य आर. ...

सिंगलसाठी
गडहिंग्लज : चन्नेकुप्पी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्यात आले. प्राचार्य आर. एस. निळपणकर यांच्याहस्ते संध्याराणी भदरगे, अर्पिता सुतार, सानिका माने, यश जाधव, सायली कर्णेकर, सानिका सावंत, प्रतीक पोवाडी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. अध्यक्षस्थानी रेखा नाईक होत्या. मुख्याध्यापक आर. ए. शेख, ए. एस. नाईक, आनंदी निकम, एस. एम. माने आदी उपस्थित होते.
----------------------------------
२) राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा
गडहिंग्लज : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विकत घेऊन मोठ्या अभिमानाने मिरवले जातात. मात्र, हेच ध्वज दुसऱ्या दिवशी रस्त्यावर व अन्यत्र फेकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी प्रशासनाने कडक नियमावली करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने प्रांताधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.
-------------------------------------
३) एरंडोळ संघाला विजेतेपद
पेरणोली : आजरा येथे आयोजित कबड्डी स्पर्धेत एरंडोळ संघाने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत १२ संघांनी भाग घेतला. स्पर्धेत रवळनाथ खेडे, आजरा कबड्डी संघ ‘अ’ व ‘ब’ या संघांनीही यश मिळविले. पेद्रेवाडी संघाला आदर्श संघ म्हणून गौरविण्यात आले.
-------------------------------------
४) मेंढोलीत आज क्रिकेट स्पर्धा
पेरणोली : मेंढोली (ता. आजरा) येथे आज (मंगळवारी) सकाळी १० वाजता हाफ पीच क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी अनुक्रमे ६००१, ४००१, २००१, १००१ अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
-------------------------------------
५) ‘युनिव्हर्स सिंबायोसीस’ पुस्तकाचे आज अनावरण
गडहिंग्लज : पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी स्थापन केलेली सिंबायोसीस संस्था यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. मंगळवार (२६) सकाळी १०.३० वाजता संस्थेच्या संचालिका संजीवनी मुजुमदार यांनी लिहिलेल्या ‘युनिव्हर्सल सिंबायोसीस’ या पुस्तकाचे अनावरण निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. एम. ए. तुटकणे यांच्याहस्ते होणार आहे, अशी माहिती व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. सतीश घाळी यांनी दिली.
-----------------------------------------
६) आजऱ्यात बुधवारी मेळावा
आजरा : गडहिंग्लज, आजरा, चंदगड व भुदरगड तालुक्यातील मराठा समाजबांधवांचा मेळावा बुधवार (२७) दु. १.३० वाजता श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात होत आहे. या मेळाव्यात तालुका कार्यकारिणीच्या निवडी होतील. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक मार्गदर्शन करणार आहेत.