सिंगलसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:01 IST2021-02-05T07:01:26+5:302021-02-05T07:01:26+5:30

गडहिंग्लज : पंचायत समिती शिक्षण विभाग व अदिती फौंडेशन, नंदनवाड यांच्यातर्फे उद्या, मंगळवारी सकाळी ११ वाजता हरळी येथील सिंबायोसिस ...

For singles | सिंगलसाठी

सिंगलसाठी

गडहिंग्लज : पंचायत समिती शिक्षण विभाग व अदिती फौंडेशन, नंदनवाड यांच्यातर्फे उद्या, मंगळवारी सकाळी ११ वाजता हरळी येथील सिंबायोसिस स्कूलमध्ये तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी दिली.

----------------------------------

गडहिंग्लजमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहर युवा हिंदू-खाटीक संघटनेतर्फे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यावेळी संजय नूलकर, अमर शेटके, किरण कांबळे, हेमंत इंगवले, अभिजित कांबळे, सागर कांबळे, आशिष शेटके, अवधूत कांबळे, आदी उपस्थित होत.

-----------------------------------

जिया मुल्ला जिल्ह्यात प्रथम

गडहिंग्लज : येथील न्यू होरायझन स्कूलची विद्यार्थिनी जिया बाळासाहेब मुल्ला हिने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी मुख्याध्यापिका सुनीता पाटील यांच्या हस्ते तिचा सत्कार झाला.

-----------------------------------

घाळी महाविद्यालयात कार्यशाळा

गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे बदललेल्या अभ्यासक्रमाविषयी ऑनलाईन कार्यशाळा झाली. कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांच्या हस्ते कार्यशाळेत उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य मंगलकुमार पाटील होते. कार्यशाळेचा ७० हून शिक्षकांनी भाग घेतला. डॉ. जी. एस. गोकावी, डॉ. बी. व्ही. ताम्हणकर, डॉ. एम. एम. माने, डॉ. एस. एस. पाटील, डॉ. रवींद्र कुपवाडे, डॉ. संजय पोरे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. एस. डी. जाधव यांनी स्वागत केले. मनीषा नाईक यांनी सूत्रसंचालन केले. किरण पाटील यांनी आभार मानले.

-----------------------------------

‘पी. सी. पाटील’तर्फे गुणिजनांचा सत्कार

गडहिंग्लज : येथील पी. सी. पाटील गुरुजी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे सेवानिवृत्त सभासद, गुणवंत शिक्षक व विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी भीमराव कडूकर होते. याप्रसंगी प्रदीप कुलकर्णी, ज्ञानदेव पाटील, सुनील इंगळे, मधुकर हराडे, संजना लोखंडे, मीना चव्हाण, शरद देसाई, संजना लोखंडे यांच्यासह विविध परीक्षा व खेळांतील यशस्वी ११५ विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. यावेळी पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, अध्यक्ष नंदकुमार वाइंगडे, ज्ञानदेव कुपटे, सुरेश गोरूले, शंकर साळोखे, आदी उपस्थित होते.

-----------------------------------

गडहिंग्लजमध्ये गांधीजींना अभिवादन

गडहिंग्लज : शहरातील रावसाहेबअण्णा कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. नगरसेविका प्रा. वीणा कापसे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी प्राचार्य विजयकुमार चौगुले, विलास शिंदे, सी. बी. कानडे, बाळासाहेब खराब, आशपाक मकानदार, दत्ता लोहार, गुरुलिंग खंदारे, आदी उपस्थित होते.

Web Title: For singles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.