सिंगलसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:01 IST2021-01-13T05:01:49+5:302021-01-13T05:01:49+5:30
नूल : नूल (ता. गडहिंग्लज) येथील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात ...

सिंगलसाठी
नूल : नूल (ता. गडहिंग्लज) येथील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. चिदानंद हुचगोंड यांनी स्वागत केले. पर्यवेक्षक गणपती चोथे व प्राचार्य जयवंत वडर यांनी प्रतिमापूजन केले. श्रीशैल साखरे यांनी मनोगत व्यक्त केले. सचिन शिंदे यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
-----------------------------------------
२) येणेचवंडीत सेवा संस्था इमारतीचे उद्घाटन
नूल : येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील श्री पांडुरंग विकास सेवा संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन अध्यक्ष सदाशिव कुराडे यांच्या हस्ते झाले. संस्थेच्या नफ्यातून सुमारे सात लाख रुपये खर्च करून इमारत उभारण्यात आली आहे. सचिव आनंदा पाटील यांनी स्वागत केले.
यावेळी अध्यक्ष नारायण नंदनवाडे, शंकर कांबळे, दुंडाप्पा बिरंजे, दत्तात्रय लोंढे, मारुती कुराडे, तम्माजी बिरंजे, तानाजी झळके, भाऊ कुराडे, आऊताई राऊत, लक्ष्मीबाई पाटील उपस्थित होते. राहुल बिरंजे यांनी बांधकाम पार पाडले, तर बँक निरीक्षक अशोक मोहिते, सहायक निबंधक व्ही. एस. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.