गायन, जुगलबंदीने महोत्सवाची सांगता
By Admin | Updated: November 23, 2015 00:04 IST2015-11-22T23:36:34+5:302015-11-23T00:04:36+5:30
रितेश, रजनीश मिश्रा यांची मैफल :पं. सी. आर. व्यास संगीत महोत्सव

गायन, जुगलबंदीने महोत्सवाची सांगता
कोल्हापूर : पंडित रितेश आणि पं. रजनीश मिश्रा यांच्या गायनाने तर पं. सतीश व्यास यांच्या संतूर, तर पं. रोणू मुजुमदार यांच्या बासरीच्या जुगलबंदीने पंडित सी. आर. व्यास संगीत संमेलनाची सांगता केली. गुणीदास फौंडेशन (कोल्हापूर) व महाराष्ट्र ललित कला निधी (मुंबई) यांच्या सहकार्याने मैफल रंगली होती. राजाराम कॉलेजमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवारी मैफलीची सुरुवात तरुण गायक रितेश आणि रजनीश मिश्रा यांच्या गायनाने झाली. ही जोडी बनारस घराण्यातली सातवी पिढी. दोघेही पं. हनुमानप्रसाद मिश्रा यांच्यासह पं. राजन व पं. साजन मिश्रा यांच्याकडून शिक्षण घेतले आहे. मैफलीची सुरुवात त्यांनी राग पुरियामधील ‘धनश्री’मधील ‘मारू बिहाग’ गाण्यासाठी निवडला होता. या रागातील ‘पैय्या तोरी लागे’ ही बंदिश गाण्यास सुरुवात केली. घराण्यातली बोल अंगाची आलापी, अकार, इकार, उकार यांचा समर्पक उपयोग, ‘प’, ‘नी’ व ‘सा’ यांची आलापी करताना सांगीतिक रचनेतली विविधता, सरगम, अनेक तीन प्रकार आणि तिन्ही सप्तकांत सहज फिरणारा आवाज यामुळे या दोघांनीही सहगायनाचा आनंद दिला. दुसऱ्या सत्रामध्ये पंडित सतीश व्यास यांच्या संतूर तर पंडित रेणू मुजुमदार बासरीची जुगलबंदीने संगीत महोत्सवाची सांगता झाली.