व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड
By Admin | Updated: December 11, 2014 00:01 IST2014-12-10T20:13:46+5:302014-12-11T00:01:47+5:30
राज्यस्पर्धेत भाग घेणार : राधाकृष्ण पेडणेकरकडे संघाचे प्रतिनिधित्व

व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड
वेंगुर्ले : कोल्हापूर-कुरुंदवाड येथे ११ ते १४ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या ४६ व्या महाराष्ट्र राज्य व्हॉलिबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संघाची निवड करण्यात आली आहे.
राधाकृष्ण पेडणेकर (पुरुष) व सिल्व्हिया सिलम (महिला) यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा संघ राज्यस्पर्धेत प्रतिनिधित्व करणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ पुढीलप्रमाणे-पुरुष- राधाकृष्ण पेडणेकर (कर्णधार), निरंजन साळगावकर, सुरेश मांजरेकर, रुपेश कोनकर, अजय नार्वेकर, जयेश मांजरेकर, अमित चव्हाण, प्रकाश आरोलकर, सॅमसन फर्नांडिस, पांडुरंग खडपकर, काका कालेलकर. संघव्यवस्थापक -सुजित चमणकर, प्रशिक्षक- राकेश केळूसकर, डिक्सन ब्रिटो. महिला-सिल्व्हिया सिलम (कर्णधार), स्मिता गोवेकर, गौरी रेगे, शेफाली गोवेकर, रक्षंदा आचरेकर, तृप्ती रावले, प्रीती नांदोसकर, श्रृतिका मर्ये, रुपाली परब, नेत्रा परूळेकर, तेजल गावडे, धनश्री साळगावकर, संघ व्यवस्थापक - उत्तेज परब, प्रशिक्षक - महेंद्र मोचेमाडकर, प्रसाद मांजरेकर.
या सर्व खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष विलास प्रभाकर गावडे, सचिव नीलेश चमणकर, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य सिद्धार्थ फडतरे यांनी अभिनंदन केले.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचा सर्व खर्च युवाशक्ती प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांनी केला आहे. (प्रतिनिधी)