कोल्हापुरातील रस्त्यावर सन्नाटाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:23 IST2021-05-19T04:23:59+5:302021-05-19T04:23:59+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून तो दि. २३ मेपर्यंत राहणार आहे. पूर्वसूचना देऊन लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे ...

Silence on the streets of Kolhapur | कोल्हापुरातील रस्त्यावर सन्नाटाच

कोल्हापुरातील रस्त्यावर सन्नाटाच

कोल्हापूर जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून तो दि. २३ मेपर्यंत राहणार आहे. पूर्वसूचना देऊन लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे नागरिकांना कसलीही गैरसोय जाणवत नाही. त्यामुळे नागरिकांनी काही तरी साहित्य खरेदीच्या निमित्ताने घराबाहेर पडणे टाळले आहे. सर्वच व्यवहार बंद असल्याने बाजारात, दुकानांतूनही काही मिळत नाही. सगळंच बंद असल्यामुळे रस्त्यावर कोणीच दिसत नाहीत.

रुग्णालयातील कर्मचारी, शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी यांच्याशिवाय ‘अत्यावश्यक सेवे’तील कर्मचारीच काय ते रस्त्यावर दिसतात. बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था बंद असल्यामुळे तेथे होणारी गर्दी टळली आहे. भाजी मार्केट बंद असल्याने मंडईचा परिसरातही सन्नाटाच आहे. आजूबाजूच्या गावातील महिला भाजी घेऊन येत असतात, परंतु वाहतूक बंद असल्याने त्यांनीही यायचे बंद केले आहे.

फोटो क्रमांक - १८०५२०२१-कोल्हापूर बंद

ओळ - कोल्हापूर जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन असल्यामुळे सर्व रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही एकदमच थांबली आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ).

Web Title: Silence on the streets of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.