शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोविड साहित्य खरेदी घोटाळा अधिवेशनात गाजण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 12:40 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेत ८८ कोटींच्या कोविड साहित्य खरेदीत झालेल्या ३५ कोटींचा घोटाळा सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजण्याची चिन्हे दिसत आहेत. तक्रारदार असलेले जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर हे कागदपत्रे घेऊन बुधवारी मुंबईला रवाना झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही सर्व घोटाळ्याची फाईल देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

ठळक मुद्देकोविड साहित्य खरेदी घोटाळा अधिवेशनात गाजण्याची चिन्हे फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्याकडे फाईल

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत ८८ कोटींच्या कोविड साहित्य खरेदीत झालेल्या ३५ कोटींचा घोटाळा सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजण्याची चिन्हे दिसत आहेत. तक्रारदार असलेले जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर हे कागदपत्रे घेऊन बुधवारी मुंबईला रवाना झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही सर्व घोटाळ्याची फाईल देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.मंगळवारी निंबाळकर यांनी कोल्हापुरात पत्रकार बैठक घेऊन लेखापरीक्षकांचा अहवाल व बाजारातील किमतीचा तुलनात्मक अभ्यास करून लॉकडाऊनकाळात कोरोना प्रतिबंधासाठी शासकीय समितीने खरेदी केलेल्या साहित्यात घोटाळा केल्याचे उघड केले होते. एक कोटीवरील खरेदीचे प्रधान सचिवांचे अधिकार असतानाही परस्पर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या सहीने खरेदी झाल्याची, ई टेंडर प्रक्रिया राबविली नसल्याची, वाढीव दराने साहित्य खरेदी केल्याचे पुरावेच दिले होते.

खरेदीत तब्बल ३५ कोटींचा घोटाळा झाल्याचेही त्यांनी उघड केले होते. हे करताना दोषींवर कारवाईच्या मागणीसह जनतेच्या पैशांवर डल्ला असल्याचे आणि शासकीय निधीचा गैरवापर असल्याचे सांगत ह्यकॅगह्णमार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती.बुधवारी निंबाळकर यांनी कागदपत्रासह मुंबई गाठली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे या घोटाळ्याकडे लक्ष वेधण्याबरोबरच यावर दोन्ही सभागृहांत चर्चा घडावी या हेतूने विरोधी पक्षनेते व प्रदेशाध्यक्षांकडे याबाबतची सर्व माहिती सांगितली जाणार आहे. कॅगमार्फत चौकशी करायची तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे अर्ज करावा लागणार असल्याने फडणवीस व पाटील यांच्या माध्यमातून तेथे पोहोचण्याचाही या भेटीमागे हेतू आहे.

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटील