जयसिंगपुरात काँग्रेसकडून स्वाक्षरी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:18 IST2021-07-16T04:18:20+5:302021-07-16T04:18:20+5:30

एक कोटी नागरिकांच्या स्वाक्षरी घेऊन युवक काँग्रेसचे राज्याध्यक्ष सत्यजित तांबे हे राष्ट्रपतींना स्वाक्षऱ्या पाठवून महागाई कमी करण्यासाठी निवेदन ...

Signature campaign from Congress in Jaysingpur | जयसिंगपुरात काँग्रेसकडून स्वाक्षरी मोहीम

जयसिंगपुरात काँग्रेसकडून स्वाक्षरी मोहीम

एक कोटी नागरिकांच्या स्वाक्षरी घेऊन युवक काँग्रेसचे राज्याध्यक्ष सत्यजित तांबे हे राष्ट्रपतींना स्वाक्षऱ्या पाठवून महागाई कमी करण्यासाठी निवेदन देणार आहेत, असे सांगून नितीन बागे म्हणाले, सर्वसामान्यांची दिशाभूल करून, लोकांना खोटे आश्वासन देऊन मोदी सरकार सत्तेवर आले. दहा कोटी नोकऱ्या, शंभर दिवसांत महागाई कमी करण्याचे वचन आणि दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलची वाढणारी महागाई त्याविरोधात कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस सर्वसामान्यांचे आवाज म्हणून रस्त्यावर तीव्र आंदोलन करणार आहे. त्यासाठी स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज निर्दयी मोदी सरकारपर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी कल्याणी माणगावे, फैसल पटेल, विठ्ठल पाटील, शाहनवाज मनेर, राजू सनदी, नईम शेख, स्वप्निल कांबळे, शीतल उपाध्ये, ओंकार मुडशी, महेश परीट, राजकुमार चौगुले, सुमीत गवळी, राजू नदाफ, दीपक कांबळे, निखिल कांबळे, अनिल महाजन यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Signature campaign from Congress in Jaysingpur