‘सिद्धेश्वर’ची पाटील क्रिकेट अकॅडमीवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:22 IST2021-03-15T04:22:21+5:302021-03-15T04:22:21+5:30

कागल मैदानावर रविवारी या दोन संघांत सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना सिद्धेश्वर संघाने ३२ षटकांत सर्व बाद २६७ धावा ...

Siddheshwar beats Patil Cricket Academy | ‘सिद्धेश्वर’ची पाटील क्रिकेट अकॅडमीवर मात

‘सिद्धेश्वर’ची पाटील क्रिकेट अकॅडमीवर मात

कागल मैदानावर रविवारी या दोन संघांत सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना सिद्धेश्वर संघाने ३२ षटकांत सर्व बाद २६७ धावा केल्या. यात डाॅ. तनिष पाटीलने ५९ चेंडूंत १०९ धावा केल्या. त्यास प्रवीण बानगे याने ६० धावा करीत मोलाची साथ दिली. साईराज डोणे २०, विजय लाड याने नाबाद १६, बलदेव माने याने १४ धावा केल्या. पाटील संघाकडून अभिजित सणगरने चार, ईश्वर घोरपडे व तन्मय म्हेत्रे यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. उत्तरादाखल खेळताना पाटील अकॅडमी संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा सर्व संघ २७ षटकांत १०६ धावांत गुंडाळला. यात तन्मय म्हेत्रे याने ३२, अभिजित सणगरने १४ धावा केल्या. सिद्धेश्वरकडून धैर्यशील इंगळेने ५, विशाल जमनिकने २, संभाजी घराळ, विजय लाड, तनिष पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केला.

फोटो : १४०३२०२१-कोल-तनिष पाटील(क्रिकेट)

Web Title: Siddheshwar beats Patil Cricket Academy