शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या सिद्धार्थ शिंदेच्या सूचना थेट अर्थसंकल्पात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 11:21 IST

शिंदे यांनी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लेख लिहून जनजागृती केली. याची बजेटमध्ये ९४ व्या उपशीर्षकांत दखल घेतली आहे.

संदीप आडनाईक कोल्हापूर : केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एकूण १४ मुद्द्यांचा परामर्श घेत त्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. विशेष म्हणजे यातील दोन मुद्द्यांविषयी कोल्हापूरचे युवा शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ शिंदे यांनी पंतप्रधान कार्यालयाशी केलेल्या पत्रव्यवहाराची दखल घेण्यात आली आहे.सिद्धार्थ शिंदे यांनी इलेक्ट्रिक कचऱ्याची विल्हेवाट आणि ग्रामीण भागातील विशेषत: सीमावर्ती भागातील इंटरनेटच्या नेटवर्कची गरज असल्याचे मुद्दे मांडले होते.शिंदे हे उच्चशिक्षित युवा उद्योजक आणि शेतकरी आहेत आणि भारतीय किसान संघाचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष आहेत. लंडन येथील ऑटो इंजिनिअरिंगमधून एमएस झालेल्या सिद्धार्थ यांनी महिंद्रा रिसर्चमध्येही काम केेले आहे. ते मूळचे कोवाड (ता. चंदगड)चे आहेत.ग्रामीण भागातील इंटरनेटच्या नेटवर्कसंदर्भातही शिंदे यांनी ५ ऑगस्ट २०२१ रोजी पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करून याची गरज आणि तरुणाईच्या गुन्हेगारीसंदर्भातील धोके स्पष्ट केले होते. भाजपचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्यामार्फत हे पत्र सरकारकडे सुपुर्द केले.शिंदे यांनी या पत्रात चंदगड तालुक्यातील झांबरे गावचे उदाहरण देत ग्रामीण भागातील तरुण गुन्हेगारीकडे वळतील असा इशारा दिला होता. या मुद्द्यांमुळे डिजिटल रिसाेर्सेससाठी आता ५ जी सेवेसाठी महाराष्ट्राला १२०० कोटींची तरतूद केली आहे.

लोकमत’मधून जनजागृतीइलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नात त्याच्या बॅटऱ्यांमुळे इलेक्ट्रिक कचऱ्याचा विषय गंभीर बनेल, त्यासाठी बॅटऱ्यांच्या एंड ऑफ लाईफविषयी त्यांनी १४ नोव्हेंबर २०२१ रोजी पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. याच विषयावर शिंदे यांनी ५ आणि १२ डिसेंबर २०२१ रोजी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लेख लिहून जनजागृती केली. याची Department of Administrative Reforms & Public Grievances या संकेतस्थळानंतर आता बजेटमध्ये ९४ व्या उपशीर्षकांत दखल घेतली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBudgetअर्थसंकल्प 2022Lokmatलोकमत