शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आधी कोरोना काळात अन् आता कायमस्वरूपी मदत करणाऱ्या 'चारचौघी'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 17:10 IST

Kolhapur : स्वच्छ पाणी मिळणे ही गरजेचे असते. हीच गरज कोल्हापुरच्या ह्या 'चारचौघी'नी ओळखली अन् आज प्रत्यक्षात प्लांट तयार करून समाजासाठी पाण्याची सोय करून दिली. 

- दुर्वा दळवी 

कोल्हापूर : कोरोना काळात आपल्या जवळील काही साठवलेले पैसे त्यांनी एकत्र केले अन् त्यातून त्यांनी कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांसाठी मोफत नाश्ता तयार करून दिला, पण याच वेळी त्यांना दिसून आली कोल्हापुरच्या सीपीआर रुग्णालयातील एक समस्या. ती म्हणजे पाण्याची समस्या. या समस्येवर त्यांनी वॉटर एटीएमचा उपाय शोधला आणि तो आता प्रत्यक्षात साकारही होत आहे. लोकवर्गणीतून पैसे उभे करून हा प्लांट तयार करण्यात आला आहे. ह्या प्लांटमधून सीपीआर रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना गरम आणि थंड पाणी इथे मिळणार आहे. 1 रुपयांत 1 लिटर पाणी येथे 24 तास मिळणार आहे. रुग्णांना उपचार घेताना गरम पाण्याची आवश्यकता असते. तसेच स्वच्छ पाणी मिळणे ही गरजेचे असते. हीच गरज कोल्हापुरच्या ह्या 'चारचौघी'नी ओळखली अन् आज प्रत्यक्षात प्लांट तयार करून समाजासाठी पाण्याची सोय करून दिली. 

श्रुती चौगुले, अर्पिता राऊत, श्रेया चौगुले आणि आचाल कटारिया याच आहेत 'चारचौघी'. ज्यांनी वॉटर एटीएम तयार केले आहे. ह्या चौघी लहानपणापासूनच मैत्रिणी. आज त्या शिक्षण घेतच समाजासाठी एक खारीचा वाटा उचलत आहेत. सीपीआर रुग्णालयात येणाऱ्या अनेक नागरिकांना त्यांच्या ह्या वॉटर एटीएमचा खूप मोठा आधार ही मिळणार आहे. आज हा प्लांट उभा करण्यासाठी लोकवर्गणीतून त्यांनी मदत घेऊन हा बहुमूल्य पाण्याचा खजिना नागरिकांच्या लोकसेवेसाठी 26 जानेवारीला  खुला करण्यात येणार आहे. हा प्लांट उभा करण्यासाठी अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. 2 लाख रुपयांहून अधिक खर्च त्यांनी केला आहे. 

नुसतीच समाजाला मदत न करता भविष्यात ही एखाद्या उत्तम गोष्टीचा समाजाला उपयोग होईल अश्या पद्धतीने विचार करून ह्या चौघींनी हा नवा प्लांट सीपीआर येथे उभा केला आहे. आज ह्या चौघींनी शिक्षण घेतच समाजासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. त्यातीलच महत्त्वाचा हा वॉटर एटीएम प्लांट. इथे आता दररोज ह्या चौघींनी शिक्षणामुळे थांबू शकणार नाहीत. त्यामुळेच कोल्हापूरकरांनी ह्या चौघींनी तयार केलेल्या ह्या पलांटला देखभालीसाठी मदत करणे गरजेचे आहे. कोल्हापुरच्या ह्या लेकिनी उत्तम कामगिरी केली असून आता हा प्लांट सुस्थितीत ठेवण्यासाठी त्यांना गरज आहे ती कोल्हापुरकरांच्या मदतीची.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर