बिंदू चौकातील तटबंदीवरील झुडपे, जाहिरात हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:24 IST2020-12-06T04:24:43+5:302020-12-06T04:24:43+5:30
कोल्हापूर : बिंदू चौकातील तटावरील झुडपे, जाहिराती हटवा, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे ...

बिंदू चौकातील तटबंदीवरील झुडपे, जाहिरात हटवा
कोल्हापूर : बिंदू चौकातील तटावरील झुडपे, जाहिराती हटवा, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे.
या निवदेनात म्हटले आहे की, कोल्हापूर शहरास ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक इतिहासकालीन वस्तू येथे आहेत. यापैकी बिंदू चौक परिसरातील तटबंदीचा समावेश आहे. सध्या तटबंदीची दुरवस्था झाली आहे. वाढलेल्या झुडपांमुळे तटाची बांधणी कमकुवत होऊन त्यास भेगा पडत आहेत. शिवाय जाहिरात रंगविल्यामुळे तटाचे सौंदर्य व ऐतिहासिक महत्त्व झाकोळले जात आहे ही बाब गंभीर असून, कोल्हापूरच्या इतिहासाबरोबरच पर्यटनावरही प्रतिकूल परिणाम करू शकते. तरी या तटबंदीची स्वच्छता करून आवश्यक ती निगा राखावी. तटबंदीच्या संवर्धनासाठी लागणारी आवश्यक कार्यवाही तत्काळ करण्यात यावी.
बातमीदार : विनोद