शेणाला गेलेल्या पोरींना श्रीशब्द काव्य पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:29 IST2021-09-12T04:29:29+5:302021-09-12T04:29:29+5:30

कोल्हापूर : स्फूती साहित्य सेवा संघाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या श्रीशब्द काव्य पुरस्कारासाठी माया पंडित यांच्या ‘तल्खली’ आणि राधानगरीचे चंद्रशेखर कांबळे ...

Shrishabda Kavya Award to the children who went to Shena | शेणाला गेलेल्या पोरींना श्रीशब्द काव्य पुरस्कार

शेणाला गेलेल्या पोरींना श्रीशब्द काव्य पुरस्कार

कोल्हापूर : स्फूती साहित्य सेवा संघाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या श्रीशब्द काव्य पुरस्कारासाठी माया पंडित यांच्या ‘तल्खली’ आणि राधानगरीचे चंद्रशेखर कांबळे यांच्या ‘शेणाला गेलेल्या पोरी’ या काव्यसंग्रहाची निवड झाली आहे. मूळचे नेज (ता. हातकणंगले) येथील प्रसिद्ध कवी चंद्रकांत पोतदार यांच्यातर्फे कै. सत्यभाभा भगवंत पोतदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. स्मृतिचिन्ह, रोख रक्कम, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

कवी सुभाष पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुरस्कारांची निवड केली. यात २०१८ सालासाठी माया पंडित यांच्या तल्खली, चंद्रपूरचे इरफान शेख यांची ‘माझ्यातला कवी मरत चाललाय’ या काव्य संग्रहाची निवड झाली. २०१९ साठी लोणार सरोवर येथील विशाल इंगोले यांच्या ‘माझ्या हयातीचा दाखला’ तर राधानगरीचे चंद्रशेखर कांबळे यांच्या शेणाला गेलेल्या पोरी या काव्यसंग्रहांची निवड झाली. २०२० साठी पाथर्डी संदीप काळे यांची सईच्या कविता तर, औरंगाबादचे हबीर भंडारे यांच्या मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं या काव्यसंग्रहांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

Web Title: Shrishabda Kavya Award to the children who went to Shena