वारणानगर परिसरात श्रींची प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:25 IST2021-09-11T04:25:39+5:302021-09-11T04:25:39+5:30
वारणानगर : अमृतनगर येथील वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावरील शिवपार्वती मंदिरात यावर्षी गणेशचतुर्थीनिमित्त श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. वारणा दूध संघाचे ...

वारणानगर परिसरात श्रींची प्रतिष्ठापना
वारणानगर : अमृतनगर येथील वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावरील शिवपार्वती मंदिरात यावर्षी गणेशचतुर्थीनिमित्त श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्या हस्ते श्रींची विधिवत पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली.
शिवपार्वंती मंदिराचे हिरेमठ स्वामी, आनंद हिरेमठ यांनी पौराेहित्य केले. यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव जंगम, अकौंटस मॅनेजर सुधीर कामेरीकर, अनिल हेर्ले, श्रीधर बुधाळे, डाॅ. अशोक पाटील, डॉ. एन. ए. पाटील, प्रकाश पाटील, दीपक पाटील, कामगार संघटना अध्यक्ष रामचंद्र जाधव, उदयसिंग जाधव, शिवाजी काळोखे इतर सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.
वारणा साखर कारखान्याच्या शेतकरी कार्यालयात सचिव बी. बी. दोशिंगे यांच्या हस्ते व विजयकुमार कोले, एस. ए. कुलकर्णी इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. वारणानगरसह परिसरामध्ये घरगुती गणपतीसह सार्वजनिक तरुण मंडळाच्या गणेशमूर्तीचे अगदी साधेपणात स्वागत करून प्रतिष्ठापना करण्यात आली.