बेनाडीच्या बुद्धिबळ स्पर्धेत रेंदाळच्या श्रीराज भोसले विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:14 IST2021-02-05T07:14:03+5:302021-02-05T07:14:03+5:30
कोल्हापूर : बेनाडी चेस असोसिएशन व कोल्हापूर चेस अकॅडमी यांच्या विद्यमाने, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि श्री काडसिद्धेश्वर शिक्षण ...

बेनाडीच्या बुद्धिबळ स्पर्धेत रेंदाळच्या श्रीराज भोसले विजेता
कोल्हापूर : बेनाडी चेस असोसिएशन व कोल्हापूर चेस अकॅडमी यांच्या विद्यमाने, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि श्री काडसिद्धेश्वर शिक्षण संस्था, बेनाडी यांच्या सहकार्याने झालेल्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग बुद्धिबळपटू कै. शैलेश नेर्लीकर स्मृती खुल्या जलद एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धेत रेंदाळचा श्रीराज भोसले सात पैकी सात गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले. सातपैकी सहा गुण चार खेळाडूंनी मिळविल्यामुळे सरस टायब्रेक आधारे इचलकरंजीचा रवींद्र निकमने उपविजेतेपद पटकाविले; तर तमिळनाडूच्या आंतरराष्ट्रीय मास्टर आर. बालसुब्रह्मण्यमला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. मिरजेच्या मुदस्सर पटेलला चौथे स्थान व कोल्हापूरच्या अनीश गांधीला पाचवे स्थान मिळाले.
डॉ. अश्विनी माने-पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचा प्रारंभ झाला. सरला नेर्लीकर व निपाणी पोलीस ठाण्याचे प्रमुख शिवानंद सारवदे, सूरज पाटील, भरत पाटोळे व सुनील शहा यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई, तमिळनाडू, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, बेळगाव, सांगली, कोल्हापूर व स्थानिक निपाणी, बेनाडी येथील नामवंत बुद्धिबळपटू स्पर्धेत सहभागी झाले होते.