श्रीपतराव दादा बँक सर्वसामान्यांच्या हितासाठी कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:30 IST2021-08-20T04:30:21+5:302021-08-20T04:30:21+5:30
भोगावती : श्रीपतरावदादा सहकारी बँकेच्या माध्यमातून अनेक तरुणांना उद्योग व्यवसायाला हातभार लावला आहे. म्हणून दादा बँक सर्वांना घरची वाटते. ...

श्रीपतराव दादा बँक सर्वसामान्यांच्या हितासाठी कटिबद्ध
भोगावती :
श्रीपतरावदादा सहकारी बँकेच्या माध्यमातून अनेक तरुणांना उद्योग व्यवसायाला हातभार लावला आहे. म्हणून दादा बँक सर्वांना घरची वाटते. आगामी काळात बँक सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्यरत राहील, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष राजेश पी.पाटील -सडोलीकर यांनी केले.
श्रीपतराव दादा सहकारी बँकेच्या भोगावती शाखेच्या वर्धापनदिन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
बँकेचे संस्थापक आमदार पी. एन.पाटील-सडोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने प्रगतीची गरूडझेप घेतली असून आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जयोजना बँकेने राबवल्या आहेत. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी ठेवपावती वितरण करण्यात आले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष गणपतराव पाटील, संचालक सुरेश पाटील, एकनाथ चौगले, तानाजी पाटील, कृष्णात कुंभार, भोगावती साखर कारखान्याचे संचालक विश्वनाथ पाटील, बी. आर. पाटील, धीरज डोंगळे, शिवाजीराव कारंडे, जयवंतराव कांबळे, राजीवजी सूतगिरणीचे संचालक चेतन पाटील, राधानगरीचे माजी उपसभापती रविश पाटील कौलवकर ,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संदीप पाटील, पृथ्वीराज चव्हाण, उदय शेळके, शाम लोकरे, शाखाधिकारी राजाराम मोरे, पंकज पाटील, सतीश पाटील, सागर डोंगळे, निवास निकम आदींसह मान्यवर उपस्थित होते.बँकेच्या हळदी येथील शाखेचा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी संपन्न झाला.
फोटो ओळी :
परिते येथील श्रीपतराव दादा सहकारी बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त ठेवपावती वितरण करताना अध्यक्ष राजेश पाटील-सडोलीकर व मान्यवर.