श्रीमंती पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:24 IST2021-05-11T04:24:50+5:302021-05-11T04:24:50+5:30
कोल्हापूर : वर्षानगरातील श्रीमंती हरी पाटील (वय) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा ...

श्रीमंती पाटील यांचे निधन
कोल्हापूर : वर्षानगरातील श्रीमंती हरी पाटील (वय) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या गोपालकृष्ण गोखले महाविद्यालयातील प्रा. आर. एच. पाटील यांच्या मातोश्री होत.
सुभाष वडर
कोल्हापूर : कागल येथील सुभाष आप्पाण्णा वडर (वय ५०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. ते राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस् बँकेचे कर्मचारी होते.
शामकांत पंडितराव
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील शामकांत कृष्णाजी पंडितराव (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, सून, भाऊ, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते पंचगंगा बँकेचे निवृत्त रोखपाल होते.
संजय दळवी
कोल्हापूर : हणमंतवाडी (ता. करवीर) येथील संजय दिनकर दळवी (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
शकुंतला कराडकर
कोल्हापूर : मंगळवार पेठेतील सुबराव गवळी तालीमजवळील शकुंतला बापूसाहेब कराडकर (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
जोहराबी सरगुरू
कोल्हापूर : रोहिणी काॅलनी, राजेंद्रनगरातील जोहराबी बाबासाहेब सरगुरू (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
सखाराम कुलकर्णी
कोल्हापूर : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील सखाराम यशवंत कुलकर्णी-नेसरीकर (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. नेसरीतील कन्या विद्यामंदिरमधील ते सेवानिवृत्त शिक्षक होते.
बाळासाहेब कस्तुरे
कोल्हापूर : कदमवाडीतील सह्याद्री हौसिंग सोसायटीतील बाळासाहेब भागोजी कस्तुरे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
सदानंद नार्वेकर
कोल्हापूर : आपटेनगरातील सदानंद मधुकर नार्वेकर (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
प्रभावती चव्हाण
कोल्हापूर : सासने काॅलनीतील प्रभावती किसन चव्हाण (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, पाच मुली, नातवंडे असा परिवार आहे.
शांता चिंचवाडकर
कोल्हापूर : नागाळा पार्कातील शांता दिलीप चिंचवाडकर (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली,बहीण, भाऊ असा परिवार आहे. फुले वाहण्याचा कार्यक्रम बुधवारी आहे. त्या रत्नागिरी सिव्हिल हाॅस्पिटलमधून इन्चार्ज सिस्टर म्हणून निवृत्त झाल्या होत्या.