श्रीकृष्ण ॲग्रीचे ३१०२ रुपये जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:17 IST2020-12-07T04:17:21+5:302020-12-07T04:17:21+5:30
चौगले म्हणाले, गूळ पावडर व साखर कारखान्याच्या पहिल्याच गळीत हंगामातील तयार होणाऱ्या गूळ पावडरला देशात व देशाबाहेर सर्वत्र चांगली ...

श्रीकृष्ण ॲग्रीचे ३१०२ रुपये जमा
चौगले म्हणाले, गूळ पावडर व साखर कारखान्याच्या पहिल्याच गळीत हंगामातील तयार होणाऱ्या गूळ पावडरला देशात व देशाबाहेर सर्वत्र चांगली मागणी होत असल्याने उत्तम व चांगल्या प्रकारची गूळ पावडर तयार करण्याचे उद्दिष्ट कारखाना प्रशासनाचे आहे. शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे त्यांच्या खात्यावर १५ दिवसांत जमा करण्याच्या दिलेल्या आश्वासनाला बांधील राहून कारखान्याकडे ८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत ऊस गाळप केलेल्या शेतकऱ्यांचे ऊस बिल त्यांच्या खात्यावर जमा केले आहे. यावेळी चीफ इंजिनिअर धिल्लन भोसले, शेती अधिकारी प्रकाश दबडे, चिफ केमिस्ट सतीश मोळे, डॉ. अजय चौगले, संचालक मारुती चौगले, आदी उपस्थित होते.
फोटो ओळ- डॉ.के.एस . चौगले.