लाभासाठी विचारधारा बदलणाऱ्यांचा श्रीपतराव शिंदे यांनी धिक्कारच केला- मंत्री मुश्रीफ
By विश्वास पाटील | Updated: October 14, 2023 23:46 IST2023-10-14T23:46:12+5:302023-10-14T23:46:30+5:30
८७व्या वर्षी माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांचे शनिवारी झाले निधन

लाभासाठी विचारधारा बदलणाऱ्यांचा श्रीपतराव शिंदे यांनी धिक्कारच केला- मंत्री मुश्रीफ
विश्वास पाटील, कोल्हापूर : लाभांसाठी आणि प्रलोभनांसाठी विचारधारा बदलणाऱ्या प्रवृत्तीचा श्रीपतराव शिंदे यांनी धिक्कारच केला अशा शब्दात कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भावना व्यक्त केल्या.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लज तालुक्याचे आणि पर्यायाने कोल्हापूर जिल्ह्याचे डाव्या विचारसरणीचे आणि चळवळीचे लढा देणारे एक महान नेतृत्व म्हणजे माजी आमदार श्रीपतराव शिंदेसाहेब. हे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले आहे. माजी आमदार शिंदे यांनी आयुष्यभर "नाही रे...." वर्गासाठी काम केले. गोरगरीब, सामान्य, कष्टकरी अशा सगळ्या लोकांसाठी त्यांनी आयुष्य वेचले. अनेक अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा या विरोधात त्यांनी कठोर प्रहार केले. तशा जुनाट्य व्यवस्था त्यांनी प्रबोधनातून नष्ट करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यांनी संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य जनतेसाठीच व्यतीत केले आणि आपली विचारधारा कधीही सोडली नाही.
आजच्या या जगात अनेक लाभांसाठी आणि प्रलोभनांसाठी विचारधारा बदलणाऱ्या प्रवृत्तीचा त्यांनी कायमपाणे धिक्कारच केला. अशा व्यक्तिमत्त्वाचे आपल्यातून निघून जाणं हे अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीला मी वंदन करतो.