शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

कोल्हापूरची श्रेया घालणार विश्व विक्रमाला गवसणी! दांडपट्ट्याने कापणार १२०० लिंबू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 19:17 IST

गेली तीन वर्ष करत आहे सराव

रमेश वारके बोरवडे : कागल तालुक्यातील बोरवडे येथील १३ वर्षाची श्रेया साठे ही जागतिक विश्वविक्रमाला गवसणी घालणार आहे. येत्या रविवारी (दि. २६) मुंबईमध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत वीस मिनिटांमध्ये दांडपट्ट्याने बाराशे लिंबू कापणार आहे. याची नोंद इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड  (आय.इ ए.) मध्ये घेतली जाणार आहे.श्रेया युवराज साठे हिने बोरवडेतीलच मार्शल आर्ट दांडपट्टा मंडळाचे वस्ताद विष्णू मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली गेली तीन वर्ष दांडपट्ट्याने लिंबू कापण्याचा सराव करून जागतिक विक्रमाला गवसणी घालण्याचे स्वप्न उराशी बाळगले. ९ मार्चला बोरवडेच्या आझाद मैदानावरती श्रेयाने १९ मि २८ सेकंदात १२०० लिंबू दांडपट्ट्याने कापून उपस्थितांची वाहवा मिळवली. यावेळी गावचे सरपंच जयश्री फराकटे, मुरगुडचे एम.डी. रावण, वस्ताद विष्णू मगदूम, सामाजिक कार्यकर्ते संभाजी फराकटे, डॉ. महादेव साठे, श्रेयाचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ उपस्थितीत होते. साठे कुटुंबिय शेतकरी असून त्यांना हा खर्च परवडणारा नव्हता. जवळपास ६० ते ७० हजार रुपये यासाठी खर्च येणार आहे. श्रेयाची जिद्द पाहून सामाजिक कार्यकर्ते संभाजी फराकटे यांनी तिचे पालकत्व स्वीकारले. तिला येणारा खर्च संभाजी फराकटे यांनी उचलला असून तिच्या अन्य खर्चासाठी लोकवर्गणीतून निधी जमा केला आहे. श्रेया येत्या रविवारी मुंबईत दांडपट्ट्याने १२०० लिंबू कापून विश्वविक्रमाला गवसणी घालणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMumbaiमुंबई