शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Mahashivratri: शिवपार्वतीच्या वास्तव्याने पावन कोल्हापुरातील श्री क्षेत्र वडणगे, स्वतंत्र मंदिरे असणारे महाराष्ट्रातील एकमेव गाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 15:41 IST

कोंबड्याला पुजणारे एकमेव गाव

कोल्हापूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वडणगे, ता. करवीर येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित यात्रा भरते. आज, बुधवारी या यात्रेला प्रारंभ होत आहे. त्यानिमित..करवीरनगरीची दक्षिण काशी, अशी ओळख आहे. भगवान शिवपार्वतीच्या वास्तव्याने पुनीत श्री क्षेत्र वडणगे गावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.वडणगे गावाचा उल्लेख प्राचीन करवीर माहात्म्य ग्रंथात आहे. गावात ३० एकर क्षेत्रात शिवपार्वती तलाव विस्तारलेला आहे. संबकेश येथील राजा गौतमी याने वडणगेत वास्तव्य केले होते. संबकेश्वराचे तळे, असा त्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथात आढळतो. या तलावाशेजारी शिव व पार्वती, अशी दोन स्वतंत्र मंदिरे आहेत. अशी मंदिरे असणारे वडणगे महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे.महाशिवरात्रीदिवशी आसपासच्या खेड्यांबरोबरच कोल्हापूर, पुणे, मुंबई या ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने शिवपार्वतीच्या दर्शनासाठी दाखल होतात. महाशिवरात्रीसह श्रावण सोमवार, नवरात्र उत्सवही मोठ्या उत्साहात साजरे होतात.           यात्रेदिवशी पहाटे सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीस अभिषेक केला जातो. त्यानंतर टाळ- मृदंगाच्या गजरात देवीची पालखी काढली जाते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक देवस्थान समितीने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. ग्रामपंचायत प्रशासन, यात्रा कमिटी व झाडवाट कुरण मंडळाच्या वतीने विविध स्पर्धा आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कोंबड्याला पुजणारे एकमेव गावकोंबडा या पाळीव पक्ष्याला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वडणगे येथे कोंबड्याच्या प्रतिकृतीची पूजा होते. करवीर भ्रमणासाठी शंकर- पार्वती गावात आले असताना तिसरा प्रहर झाल्याने कोंबडा आरवला, असा उल्लेख प्राचीन ग्रंथात आहे. केवळ कोंबड्यामुळेच वडणगे गावात शिवपार्वती कायमचे वास्तव्यास राहिले, म्हणून या कोंबड्याची पूजा केली जाते.

- सुनील स. पाटील, वडणगे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahashivratriमहाशिवरात्री