श्रद्धा पॅटर्न पश्चिम महाराष्ट्रात अव्वल - तांबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST2021-09-18T04:25:15+5:302021-09-18T04:25:15+5:30
यड्राव : श्रद्धा ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कोरोना महामारीच्या काळातही सी. ए. फाउंडेशन परीक्षेत यश प्राप्त केले आहे. यामुळे पुन्हा ...

श्रद्धा पॅटर्न पश्चिम महाराष्ट्रात अव्वल - तांबे
यड्राव : श्रद्धा ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कोरोना महामारीच्या काळातही सी. ए. फाउंडेशन परीक्षेत यश प्राप्त केले आहे. यामुळे पुन्हा एकदा श्रद्धा पॅटर्न पश्चिम महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे, असे गौरवोद्गार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ए. आर. तांबे यांनी केले.
येथील श्रद्धा ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी सी. ए. अभ्यासक्रमातील महत्त्वाच्या टप्प्यातील सी ए फाउंडेशन परीक्षेत २५ पैकी १० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन उच्चांक गाठला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्राचार्य अक्षय तांबे यांनी प्रास्ताविक करून म्हणाले की, संपूर्ण भारतात सीए फाउंडेशनचा निकाल हा २६.६२ टक्के आहे. तर श्रद्धा कॉलेजचा ४० टक्के निकाल लागला आहे. ही निकालाची टक्केवारी संस्थेला अभिमानास्पद आहे.
उत्तीर्ण विद्यार्थी सीया चौधरी (३४०), गणेश पेटकर(३३८), पायल बेदमुथा (३३०),सुजल वसवाडे (२९१), हर्षवर्धन राऊत (२७८), देबश्री देबनाथ (२७०), श्रेया पाटील(२४३), सानिका रायनाडे (२४२), शुभम शिरोळे (२३७), रिया चोपडा (२०३) तसेच मार्गदर्शक ए. आर. तांबे, एम. एस. पाटील, प्राचार्य अक्षय तांबे, अभिषेक तांबे, टी. एन. हिंगणगावे, एस. वाय. कौंदाडे, एस. एस. पवार, मधुरा कानिटकर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेच्या विश्वस्त राजश्री तांबे यांनी आभार मानले.
फोटो - १७०९२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - श्रद्धा कॉलेज इचलकरंजीच्या सीए फाउंडेशन परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ए. आर. तांबे, एम. एस. पाटील, अक्षय तांबे, अभिषेक तांबे, टी. एन. हिंगणगावे, एस. वाय. कौंदाडे, एस. एस. पवार, मधुरा कानिटकर उपस्थित होते.