कर्जमाफी घेतलेला शेतकरी दाखवा : पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 01:05 AM2017-08-21T01:05:23+5:302017-08-21T01:05:23+5:30

Show loan defaulters: Pawar | कर्जमाफी घेतलेला शेतकरी दाखवा : पवार

कर्जमाफी घेतलेला शेतकरी दाखवा : पवार

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : संपूर्ण महाराष्टÑात शेतकºयांच्या कर्जमाफीचा दिंडोरा पिटला जात असताना कर्जमाफी झालेला एकतरी शेतकरी मुख्यमंत्र्यांनी दाखवावा, असे आव्हान रविवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केले.
राष्टÑवादी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्ते एच. डी. बाबा पाटील यांच्या निधनाबद्दल नातेवाइकांचे सांत्वन करण्यासाठी तसेच ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते रविवारी कोल्हापुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्टÑात भाजप सरकारने जाहीर केलेल्या शेतकºयांच्या कर्जमाफीचा परामर्ष घेताना ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली, त्याचा दिंडोरा संपूर्ण महाराष्टÑभर पिटला जात आहे; पण कर्जमाफीचे निकषच काय आहेत हे
मलाही माहीत नाहीत. मी मुख्यमंत्री असताना सन १९७८ मध्ये शेतकºयांसाठी पहिली कर्जमाफी केली त्याचवेळी
प्रा. एन. डी. पाटील हे सुकाणू समितीचे अध्यक्ष होते. त्यावेळी मी कर्जमाफी
जाहीर करताना कोणतेही निकष
लावले नव्हते. त्यानंतर वीस वर्षांनी पुन्हा कर्जमाफी केली; पण सध्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी लावलेल्या निकषांमुळे एकातरी शेतकºयाला त्याचा लाभ मिळाला का ते त्यांनीच दाखवावे, असेही ते म्हणाले. गेल्यावेळी कर्जमाफी केली तरीही
पुढे शेतकरी कर्जबाजारीच राहिल्याचा भाजप सरकारचा आरोप आहे,
त्यावर पवार म्हणाले, शेतकºयाच्या मालाला हमीभाव निश्चित नाही,
त्यात हवामानावर शेतकºयांचे
पीक अवलंबून असते, त्यामुळे
शेतकरी नेहमीच अडचणीत
येतो म्हणूनच शेतकºयाला
कर्जमाफी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
हा ‘त्यांचा’ नवा व्यापार
देशात किमान ५० वर्षे भाजपाची सत्ता राहील, असे अमित शहा यांचे विधान असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता पवार म्हणाले, हा त्यांनी ज्योतिषाचा नवीन व्यापार सुरू केला. गुजरातमध्ये त्यांचे अनेक व्यापार आहेत त्यापैकीच हा असावा; पण हा व्यापार त्यांच्याकडून चांगला चालेल पण त्याबाबत आपल्याला काहीही माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.
सदाभाऊ खोत
यांचे काय योगदान
खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांच्यात फूट पडल्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, शेट्टी यांचे संसदेतील काम चांगले आहे, पण दुसºयाचे काय योगदान आहे? ते फक्त मीडियातच दिसत असल्याचा टोला मंत्री सदाभाऊ खोत यांना त्यांचे नाव न घेता लगावला.
काँग्रेसची सद्य:स्थितीत वेगळी भूमिका
भाजप सरकारच्या विरोधात सर्व पक्ष एकवटल्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, विरोधातील सर्व पक्ष एकत्रित काम करतील अशी उमेद आहे; पण काँग्रेसची भूमिका सद्य:स्थितीत वेगळी असल्याचे जाणवते.
गुजरात राज्यसभेच्या निवडणुकीत राष्टÑवादीने एकही मत दिले नसल्याची भावना राष्टÑीय काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे; पण रा ष्टÑवादीच्या दोनपैकी एक मत मिळाल्यामुळेच काँग्रेसचे अहमद पटेल हे विजयी झालेत हे काँग्रेसने विसरू नये. एकत्र काम करताना दोन्हीही पक्षांनी एकमेकांवर शंका घेऊ नये, असाही टोला त्यांनी लगावला.
सरकारचे निर्णय कोल्हापुरातूनच!
१ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत; पण सध्या सरकारमध्ये गंमतच सुरू असल्याचे दिसते. कारण यापूर्वी सरकारमधील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना असत; पण हल्ली भाजपचे सर्व निर्णय हे कोल्हापुरातूनच होत आहेत.
२ अगदी मंत्रिपदेही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याऐवजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील हेच जाहीर करीत आहेत. त्यामुळे भाजपकडून सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे चांगले धोरण राबविले जात असल्याची कोपरखळी शरद पवार यांनी मारली

Web Title: Show loan defaulters: Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.