शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात निवृत्तीचे वय असले पाहिजे का? अजितदादांनी एका वाक्यात मजेशीर दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 19:50 IST

आज कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुलाखत अभिनेते गिरीष कुलकर्णी यांनी घेतली.

Ajit Pawar ( Marathi News ) : कोल्हापूर-  आज कोल्हापुरातील कणेरी मठ येथे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र आयोजित दुसरे राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडले. या सोहळ्यासाठी राज्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी अजित पवार यांची अभिनेते गिरीष कुलकर्णी यांनी मुलाखत घेतली. देशातील आणि राज्यातील सध्याचे राजकारण तसेच जुन्या काळातील आठवणी अजित पवार यांनी सांगितल्या. 

या मुलाखतीत अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील फूट आणि राजकारणातील निवृत्तीच्या वयाबाबतही भाष्य केले. अभिनेते गिरीष कुलकर्णी यांनी अजितदादांना राजकारणात निवृत्तीचे वय असले पाहिजे का असा प्रश्न केला, यावेळी उत्तर देताना अजित पवार म्हणाले, आता आपली एवढी चांगली मुलाखत सुरू आहे, यात तुम्ही का मीठाचा खडा टाकत आहात', असं उत्तर देताच सभागृहात एकच हशा पिकला. 

'राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर उद्या आणि परवा अंतिम सुनावणी', राहुल नार्वेकरांची माहिती

यावेळी अजित पवार यांनी राजकारणात प्रवेशावेळच्या आठवणींना उजाळा दिला.अजित पवारी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं कौतुक केले. अजितदादा म्हणाले, त्यावेळी जगात मंदीची लाट आली होती तेव्हा भारत देश वाचला ते फक्त मनमोहन सिंह यांच्या खुल्या अर्थव्यवस्थेमुळे, असं कौतुक पवार यांनी केले. "आता तसेच नेतृत्व पीएम नरेंद्र मोदी यांच्यात आहे, देशात तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करा म्हणणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देशात वंदे भारत ट्रेन, हायवे मोठे करण्याच काम , परदेशात भारताच स्थान वेगळ निर्माण झाले आहे, असंही पवार म्हणाले. 

"डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आता आपण एकत्रित आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. जनता जनार्दन जे ठरवेल तेच होतं. सध्या बिहारमध्ये जे घडले आहे, त्यात थोडस वेगळ आहे. आम्हाला असं कळलं की तिथे नितीश कुमार यांच्या पक्षातील आमदार फोडण्याच काम सुरू होते. त्यामुळे त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा दावाही अजित पवार यांनी केला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारkolhapurकोल्हापूरSharad Pawarशरद पवार