शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीचा आदेश न आणल्यास मुख्यमंत्र्यांना कोल्हापूर बंद? 

By समीर देशपांडे | Updated: June 22, 2024 20:33 IST

हद्दवाढ कृती समन्वय समितीची उद्या बैठक

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीचा आदेश न आणल्यास मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांना कोल्हापूर बंद करायचे की काळे झेडे दाखवायचे यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी उद्या रविवारी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती व समन्वय समितीच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.महाराणा प्रताप चौकात सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या बैठकीसाठी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, अॅड. बाबा इंदूलकर आणि बाबा पार्टे यांनी केले आहे. सन १९४६ पासून कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाही. जानेवारी २०२१ मध्ये शिंदे हे नगरविकास मंत्री असताना कोल्हापूरला आले होते. त्यावेळी त्यांची भेट घेतली असता त्यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव मागवून घेतला होता. परंतू याबाबत काहीही निर्णय झाला नाही. यानंतर समितीने अनेकवेळा तत्कालिन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली.

‘विषय नवीन आहे. मी समजून घेतो. वेळ पडली तरी २० गावात फिरून मी त्यांची समजूत काढेन’ असे आश्वासन केसरकर यांनी दिले होते. परंतू नंतर ते फिरकलेच नाहीत आणि नंतर त्यांचे पदही गेले. १५ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ध्वजवंदनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हद्दवाढीची गरज स्पष्ट केली होती.मात्र प्रस्ताव देवून चार वर्षे झाली, शिंदे नगरविकास खात्यापासून मुख्यमंत्री झाले तरीही एका इंचाने कोल्हापूरची हद्द वाढली नाही. त्यामुळेच त्यांच्या २७ जूनच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी त्यांना कोल्हापूर बंद करायचे की काळे झेंडे दाखवून निषेध करायचा यावर चर्चा करण्यासाठी या उद्याच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्री