संक्षिप्त वृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:25 IST2021-01-23T04:25:26+5:302021-01-23T04:25:26+5:30
कोल्हापूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी कोल्हापुरातही मंगळवारी प्रजासत्ताकदिनी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले ...

संक्षिप्त वृत्त
कोल्हापूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी कोल्हापुरातही मंगळवारी प्रजासत्ताकदिनी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले आहे. सकाळी ११ वाजता दसरा चौकात एकत्र जमावे, तेथून शहरभर हे संचलन होईल, असे ठरले आहे. दरम्यान, सोमवारी मुंबईत राजभवनावरील मोर्चा आणि आझाद मैदानावरील एकत्रित ध्वजवंदनासाठी रविवारी संध्याकाळी वाहने निघणार असून, मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नामदेव गावडे, चंद्रकांत यादव, वसंतराव पाटील, संदीप देसाई, सतीशचंद्र कांबळे, बाबूराव कदम, शंकर काटाळे, रघुनाथ कांबळे, सुभाष सावंत यांनी केले आहे.
श्रमिक मुक्ती दलाचे आजपासून कासेगावात अधिवेशन
कोल्हापूर : श्रमिक मुक्ती दलाचे ३३ वे राज्य अधिवेशन आज आणि उद्या (२३ व २४ जानेवारी) कासेगाव. जिल्हा सांगली येथे क्रांतिवीर बाबूजी पाटणकर लोकशास्त्रीय संशोधन व प्रबोधन संस्थेत होत आहे. शोषणमुक्त निरोगी समाजनिर्मितीसाठी चळवळीसंदर्भात अधिवेशनात चर्चा होणार आहे. कोरोनाकाळात सर्वच घटकावर झालेल्या आघातानंतर काय भूमिका घेऊन चळवळीची नव्याने संघटनात्मक बांधणीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर व कार्याध्यक्ष संपत देसाई यांनी सांगितले.
क्रॉसकंट्री स्पर्धेची बुधवारी निवड चाचणी
कोल्हापूर : पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठीची जिल्हा संघ निवड चाचणी येत्या बुधवारी (दि.२७) कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनमार्फत होणार आहे. १६, १८, २० वर्षांखालील मुले, मुली या वयोगटातील खेळाडूंची ही चाचणी बी.पी.एड कॉलेज वाडीपीर जीवबानाना पार्क येथे सकाळी साडेआठ वाजता घेण्यात येणार आहे.