संक्षिप्त वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:17 IST2021-01-01T04:17:23+5:302021-01-01T04:17:23+5:30

कोल्हापूर : पेन्शनच्या मागणीसाठी सोमवारी (दि. ४) अंगणवाडी कर्मचारी धरणे आंदोलन करणार आहेत. राज्यभरातील प्रत्येक तालुक्यात पंचायत समितीसमोर होणारे ...

Short story | संक्षिप्त वृत्त

संक्षिप्त वृत्त

कोल्हापूर : पेन्शनच्या मागणीसाठी सोमवारी (दि. ४) अंगणवाडी कर्मचारी धरणे आंदोलन करणार आहेत. राज्यभरातील प्रत्येक तालुक्यात पंचायत समितीसमोर होणारे हे आंदोलन २० जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. पेन्शनचा अहवाल शासनाकडे सादर होऊनही निर्णय होत नसल्याने हे आंदोलन करण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचारी महासंघाने जाहीर केला आहे.

नव्या वर्षाची सुरुवात व्यसनविरोधी प्रतिज्ञेने

कोल्हापूर : जनस्वास्थ्य दक्षता समिती, जिल्हा परिषद शिक्षण विभाग व मुख्याध्यापक संघाच्या वतीने नव्या वर्षाची सुरुवात जनस्वास्थ्य प्रतिज्ञेने होणार आहे. कोरोनामुळे दरवर्षी होणारा मानवी साखळी कार्यक्रम रद्द करून आज, शुक्रवारी भवानी मंडपात दुपारी १२ वाजता प्रतिज्ञा फक्त घेतली जाणार आहे. यात विद्यापीठ हायस्कूल, इंदुमती हायस्कूल, डी. डी. शिंदे ज्युनिअर कॉलेजचे मोजकेच विद्यार्थी व दक्षता समिती कार्यकर्ते मास्क व शारीरिक अंतराचे नियम पाळून सहभागी होणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांनी दिली.

Web Title: Short story