संक्षिप्त वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:21 IST2021-03-07T04:21:57+5:302021-03-07T04:21:57+5:30

कोल्हापूर: भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (दि. १४ मार्च) प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुलांना घडवलेल्या महिलांचा ...

Short story | संक्षिप्त वृत्त

संक्षिप्त वृत्त

कोल्हापूर: भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (दि. १४ मार्च) प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुलांना घडवलेल्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी अशा महिलांनी आपली माहिती समितीच्या कार्यालयाकडे गुरुवारपर्यंत पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

ही माहिती महादेवी वाळवेकर, १८६९-अ १, बी वॉर्ड, शिवनंदी प्रसाद अपार्टमेंट, युनिट नं ४, संभाजी नगर ४१६०१२ येथे पाठवावी असे पत्रकात नमूद आहे.

--

महिलांसाठी आज आरोग्य शिबिर

कोल्हापूर : महिला दिनाचे औचित्य साधून ब्राह्मणसभा करवीर (मंगलधाम) व हेल्थ व्ह्यु लॅबोरेटरीच्या वतीने आज रविवारी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याअंतर्गत अत्यल्प शुल्कात रक्त चाचणी होणार आहे. तरी इच्छुकांनी बिनखांबी गणेशमंदिराजवळील कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

--

Web Title: Short story