संक्षिप्त वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:45 IST2021-02-28T04:45:54+5:302021-02-28T04:45:54+5:30

कोल्हापूर : कॉम्रेड संतराम पाटील श्रमिक ट्रस्टतर्फे जिल्ह्यातील श्रमिक, पुरोगामी सांस्कृतिक व सामाजिक च‌ळवळीत काम करणारे कार्यकर्ते, होतकरू विद्यार्थी, ...

Short story | संक्षिप्त वृत्त

संक्षिप्त वृत्त

कोल्हापूर : कॉम्रेड संतराम पाटील श्रमिक ट्रस्टतर्फे जिल्ह्यातील श्रमिक, पुरोगामी सांस्कृतिक व सामाजिक च‌ळवळीत काम करणारे कार्यकर्ते, होतकरू विद्यार्थी, विद्यार्थिनी, वैद्यकीय मदतीची गरज असलेले कार्यकर्ते यांना सहाय्य करण्यात येत आहे.

या सहाय्यासाठी ट्रस्टतर्फे विहीत नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत असून, ते अर्ज आनंदा पाटील, १२८९, सी श्रमिक येथे पाठवावेत व एक प्रत अजित पाटील, विशाखा रिजन्सी, समर्पण ट्रस्टसमोर, सानेगुरुजी नगर, मुलुंड पूर्व मुंबई येथे पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्जाचा विचार करून ३१ मार्चपर्यंत सहाय्य वितरित करण्यात येईल.

---

सुदीक्षाजी महाराज यांचे व्हर्च्युअल समागम

कोल्हापूर : निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांचे व्हर्च्युअल समागम मिशनच्या वेबसाईटवर प्रसारित केले जात आहे. आज, रविवारी या समागमचा अखेरचा दिवस आहे.

हा कार्यक्रम समागम संस्कार टीव्ही चॅनेलवर सायंकाळी पाच ते रात्री नऊ यावेळेत प्रसारित होत आहे.

--

फोटो नं २७०२२०२१-कोल-सुदीक्षाजी महाराज

--

Web Title: Short story