संक्षिप्त वृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:16 IST2020-12-07T04:16:50+5:302020-12-07T04:16:50+5:30
काेल्हापूर : फुलेवाडी येथील ज्येष्ठ गायक भारत सदाशिव चव्हाण यांना ईगल फौंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय गरुडझेप पुरस्काराने सन्मानित करण्यात ...

संक्षिप्त वृत्त
काेल्हापूर : फुलेवाडी येथील ज्येष्ठ गायक भारत सदाशिव चव्हाण यांना ईगल फौंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय गरुडझेप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रत्नागिरीत झालेल्या कार्यक्रमात आमदार नरेंद्र दराडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले.
यावेळी साहाय्यक पोलीस आयुक्त मनीषा नलवडे, ज्येष्ठ विधिज्ञ राजशेखर मलुष्टे, आटपाटी पंचायत समिती सभापती भूमिका बेरगळ, ईगल फौंडेशनचे अध्यक्ष विलास कोळेकर, उपाध्यक्ष सागर पाटील, सचिव शेखर सूर्यवंशी उपस्थित होते.
साहित्यप्रेमी मंडळातर्फे कवितालेखन स्पर्धा
कोल्हापूर : सोमेश्वर (ता. बारामती) येथील साहित्यप्रेमी मंडळाने राज्यस्तरीय खुल्या कवितालेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. उत्कृष्ट कवितेसाठी वीस, पंधरा, दहा हजार रुपये असे रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे. राज्यातील निवडक ५०० कवितांचा ‘काव्यसुगंध’ हा कवितासंग्रह केला जाणार आहे. याशिवाय राज्यस्तरीय साहित्यरत्न व जीवनसाधना पुरस्कारही देण्यात येणार आहेत. त्यासाठी २५ डिसेंबरपर्यंत साहित्य व वैयक्तिक माहिती पाठविण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष हनुमंत माने यांनी केले आहे.
कारवाईच्या मागणीसाठी महिलेचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दंडवत
कोल्हापूर : स्वत:च्या मालकीच्या जागेतील अतिक्रमणास विरोध केल्याने शिवीगाळ करणाऱ्या शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करूनही पोलिसांनी तक्रार नाेंद न करता पोलीस ठाण्यातून हाकलून दिले. त्यामुळे शेतकरी व पोलीस यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी साके (ता. कागल) येथील शालाबाई केरबा कांबळे या उद्या, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडवत घालणार आहेत. बिंदू चौकातून दंडवताला सुरुवात होणार आहे. तरीदेखील दखल न घेतल्यास आत्मदहन करू, असा इशाराही कांबळे यांनी दिला आहे.