थोडक्यात महत्वाचे १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:20 IST2020-12-09T04:20:00+5:302020-12-09T04:20:00+5:30

गडहिंग्लज : लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत यासाठी मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथील नागरिकांनी मोर्चा काढून गावातील मुख्य ...

In short, important 1 | थोडक्यात महत्वाचे १

थोडक्यात महत्वाचे १

गडहिंग्लज : लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत यासाठी मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथील नागरिकांनी मोर्चा काढून गावातील मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन केले. महावितरणचे उपअभियंता राजेंद्र खांडेकर यांना निवेदन दिले.

आंदोलनात भाजप युवा मोर्चाचे एल. टी. नवलाज, निंगाप्पा धुळाज, संतोष जरळी, अप्पाण्णा राचाण्णावर, संजय मुरगी, ईराप्पा अन्नछत्रे, धुळाप्पा कोरे, मल्लाप्पा तोदली, संजय मुरगी, शिवलिंग कोळी, महानंदा कांबळे, सत्यव्वा वरगे, आदींनी भाग घेतला.

--------------------------------

२) नूलमध्ये आगीमुळे उसाचे नुकसान

नूल : नूल (ता. गडहिंग्लज) येथे विलास कुलकर्णी यांच्या एक एकरातील उसाला लागलेल्या आगीमुळे पाऊण लाखाचे नुकसान झाले. सोमवारी (दि. ७) दुपारी ही घटना घडली.

कुलकर्णी यांचे नूलपैकी रामपूरवाडी येथे शेत आहे. सोमवारी दुपारी ऊसतोड सुरू असताना शॉर्टसर्किटने आग लागल्यामुळे ऊस जळून खाक झाला. यामध्ये ट्रॉलीच्या टायरचाही समावेश आहे.

आग विझविण्यासाठी सुरेश आरबोळे, अजित चितारी, दयानंद देसाई, वीरपाक्ष गोजी, उदयसिंह चव्हाण, भीमा तराळ व ग्रामस्थांनी आग विझवली. दरम्यान, घटनास्थळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

--------------------------------

३) गडहिंग्लजला काळभैरव जन्मोत्सव साधेपणाने

गडहिंग्लज : सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरव देवाचा जन्मोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. डोंगरावरील मंदिरात प्रमुख मानकरी व गुरव यांच्या उपस्थितीत श्रींची पूजाअर्चा, अभिषेक व जन्मोत्सव झाला. यावेळी अश्विन गुरव, अण्णासाहेब गुरव, राजेंद्र मांडेकर, संजय गुरव, मंजूषा कदम, आदींसह सेवेकरी, मानकरी व भक्तगण उपस्थित होते.

--------------------------------

४) गडहिंग्लजला स्मशानभूमी दुरुस्तीची मागणी

गडहिंग्लज : शहरातील नदीवेस परिसरात असलेल्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे स्मशानभूमीची तत्काळ दुरुस्ती करा, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांना देण्यात आले.

निवेदनावर, शहरप्रमुख अशोक शिंदे, वसंत शेटके, मनीष हावळ, सुरेश हेब्बाळे, संजय संकपाळ, राकेश परीट, बजरंग आजगेकर, राहुल खोत, सागर हासणे, नरेंद्र वडेर, मंथन भडगावकर, रमेश शिंदे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

--------------------------------

Web Title: In short, important 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.