जयसिंगपुरात आजपासून दुकाने सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:30 IST2021-07-07T04:30:56+5:302021-07-07T04:30:56+5:30
जयसिंगपूर : सरसकट दुकाने सुरू करा, अन्यथा बंद करा, अशी भूमिका यापूर्वीही घेतली असताना प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. ...

जयसिंगपुरात आजपासून दुकाने सुरू करणार
जयसिंगपूर : सरसकट दुकाने सुरू करा, अन्यथा बंद करा, अशी भूमिका यापूर्वीही घेतली असताना प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. मात्र, आज बुधवारपासून शहरातील सर्व व्यवहार सुरू करण्याचा निर्धार व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत सायंकाळी घेण्यात आला.
शहरामध्ये व्यापाऱ्यांना वेठीस धरून दंडात्मक कारवाई करण्यावरून २९ जूनला व्यापाऱ्यांनी पालिका प्रशासनाला जाब विचारला होता. या वेळी सरकसट दुकाने, फेरीवाले बंद करा अन्यथा सर्वच सुरू करा, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली होती. या वेळी प्रशासनाने नियमानुसार कार्यवाही केली जाईल, असा इशारा दिला होता. दरम्यान, याबाबत अद्याप निर्णय न झाल्याने मंगळवारी सायंकाळी व्यापारी एकत्र आले. या वेळी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून सरसकट दुकाने बुधवारपासून सुरू करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. सकाळी सात ते चार व वीकेंड लॉकडाऊन याचे पालन केले जाईल, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.
फोटो - ०६०७२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे मंगळवारी व्यापारी असोसिएशनची बैठक पार पडली.