गणेशोत्सव वर्गणीवरून दुकानमालकावर खुनी हल्ला

By Admin | Updated: August 31, 2015 00:36 IST2015-08-31T00:36:42+5:302015-08-31T00:36:42+5:30

कोल्हापुरातील घटना : ‘पीटीएम’च्या कार्यकर्त्यांचे कृत्य; दुकानाची तोडफोड

A shopkeeper murderer from Ganesh Festival | गणेशोत्सव वर्गणीवरून दुकानमालकावर खुनी हल्ला

गणेशोत्सव वर्गणीवरून दुकानमालकावर खुनी हल्ला

कोल्हापूर : गणेशोत्सवाची वर्गणी कमी दिल्याच्या रागातून मंगळवार पेठेतील ‘पीटीएम’च्या कार्यकर्त्यांनी शिवाजी स्टेडियम येथील हिंद स्टेशनरीच्या मालकावर रविवारी सायंकाळी खुनी हल्ला केला. अझरूद्दीन अल्ताफ मोमीन (३०, रा. मंडलिक वसाहत) असे जखमीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, शिवाजी स्टेडियम येथील गाळ्यामध्ये अझरूद्दीन मोमीन यांचे हिंद स्टेशनरी स्टोअर्स दुकान आहे. नेहमीप्रमाणे रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास ते दुकानात होते. यावेळी मंगळवार पेठेतील ‘पीटीएम’चे कार्यकर्ते गणेशोत्सवाची वर्गणी मागण्यासाठी आले. यावेळी मोमीन यांनी ५१ रुपयांची पावती केली. त्यास कार्यकर्त्यांनी विरोध करत १०१ रुपयांची पावती करण्यास सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला.
यावेळी पाण्याचा कॅन व लोखंडी रॉड त्यांच्या डोक्यात मारून
गंभीर जखमी केले तसेच त्यांच्या दुकानाची तोडफोडही करण्यात
आली. या प्रकाराने गोंधळ उडाल्याने परिसरात तणाव पसरला. हल्ल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मोमीन यांच्या अन्य नातेवाईकांनी त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. पोलिसांनी सीपीआरमध्ये येऊन जखमी मोमीन यांच्या प्रकृतीची विचारपूस करून हल्लेखोरांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी ‘पीटीएम’च्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे सांगितले. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करून संशयितांची धरपकड सुरू होती. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डी. एम. गायकवाड करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: A shopkeeper murderer from Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.