शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! आंघोळीवरुन वाद झाल्यानं सासऱ्याने कोयत्यानं तोडले सूनेचे हात, नातवांवरही केले सपासप वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 12:33 IST

आंघोळीच्या पाण्यावरुन झालेल्या वादातून सास-यानं सून आणि नातवांवर कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

ठळक मुद्देआंघोळीच्या पाण्यावरुन वाददोन्ही नातवांवरही परळीचे वार सून शुभांगी हिचे दोन्ही हात तुटले

कोल्हापूर - आंघोळीच्या पाण्यावरुन झालेल्या वादातून सास-यानं सून आणि नातवांवर कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मल्हारपेठ सावर्डे येथील पन्हाळा तालुक्यातील गावात बुधवारी (14 फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या वादातून सास-यानं चक्क आपल्या सूनेचे कोयत्याने हातच तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

आंघोळीच्या पाण्यावरुन झालेल्या वादातून सासऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले. यादरम्यान आईला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणा-या दोन्ही नातवांवरही त्याने कोयत्यानं वार केले. या घटने सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत.  जखमींना कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सूनेची प्रकृती गंभीर आहे.

मल्हारपेठ-सावर्डे या गावातील पांडुरंग दशरथ सातपुते (वय ६0) यांनी बुधवारी सकाळी आंघोळीसाठी प्रथम नंबर कुणाचा यावरुन वाद घालत सून शुभांगी रमेश सातपुते (वय ३0) हिच्यावर कोयत्यानं वार केला. यात तिचे दोन्ही हात तुटले. हे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणा-या  मयुरेश (वय ९) आणि कनिष्क (वय ४) या दोन नातवांच्या डोक्यावरही पांडुरंग यांनी कोयत्यानं वार केल्याने ते जखमी झाले आहेत. या झटापटीत पांडुरंगदेखील जखमी झाले.या चौघांनाही उपचारासाठी कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सून शुभांगी हिचे दोन्ही हात तुटले असल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. तिला शासकीय रुग्णालयातून खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. याबाबत कळे पोलीस ठाण्यात सासरे पांडुरंग सातपुते यांच्याविरोधात  गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर