आरक्षण सोडतीत विद्यमान नगरसेवकांना झटका
By Admin | Updated: July 2, 2016 00:56 IST2016-07-02T00:56:06+5:302016-07-02T00:56:25+5:30
इचलकरंजीत आरक्षणाच्या सोडतीवेळी काही नगरसेवकांना हक्काच्या प्रभागावर पाणी सोडावे लागले.

आरक्षण सोडतीत विद्यमान नगरसेवकांना झटका
कोल्हापूर : जिल्ह्यातील ९ नगरपालिकांसाठी शुक्रवारी झालेल्या आरक्षण सोडतीत अनेक विद्यमान नगरसेवकांना हक्काचे प्रभाग राखीव झाल्याने फटका बसला. त्यांनी आतापासूनच जवळच्या ‘सेफ’ प्रभागाची चाचपणी सुरु केली आहे. जिल्ह्यातील नऊही नगरपालिकांत प्रशासनाने जाहीर केलेल्या ठिकाणी व त्या वेळेनुसार आयोजित कार्यक्रमात लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित केले.
इचलकरंजीत आरक्षणाच्या सोडतीवेळी काही नगरसेवकांना हक्काच्या प्रभागावर पाणी सोडावे लागले. गडहिंग्लजमध्ये सर्वच विद्यमान नगरसेवकांना पुन्हा आपल्या प्रभागातून लढण्याची संधी मिळाली आहे. जयसिंगपूरमध्ये प्रभाग ६, ८, १० व ११ सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने तेथे रंगत वाढणार आहे. मलकापुरात नगराध्यक्ष, विरोधी पक्ष नेत्यांच्या प्रभागात आरक्षण बदलल्याने त्यांची गोची झाली आहे. कागलमध्ये सात जागा खुल्या झाल्या आहेत. मुरगूडमध्ये आठ प्रभागांतून एकूण सतरा सदस्यांपैकी ९ महिला सदस्यांचे आरक्षण निश्चित झाले. कुरुंदवाडमध्ये नगराध्यक्षा मनीषा डांगे, आघाडीप्रमुख रामचंद्र डांगे, उपनगराध्यक्ष वैभव उगळे, नगरसेवक सुरेश कडाळे यांना पुन्हा त्यांच्या प्रभागातून संधी आहे़ पेठवडगावात विद्यमान काही नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसला आहे.
(सविस्तर वृत्त हॅलो ५)