शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बेळगाव महापालिकेच्या महापौरपदी शोभा सोमणा, रेश्मा पाटील उपमहापौर; भाजपकडून पहिल्यांदाच मराठी भाषिक महिलांची निवड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 16:44 IST

निवडणूक प्रक्रियेस वेळेवर उपस्थित न राहणाऱ्या 3 नगरसेवकांना सभागृहाबाहेरच रोखण्यात आल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले

प्रकाश बेळगोजी बेळगाव : राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या बेळगावमहापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज, सोमवारी पार पडली. यात महापौरपदी शोभा सोमणा तर उपमहापौरपदी रेश्मा पाटील यांची निवड झाली. बेळगाव महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपकडून महापौर व उपमहापौरपदी मराठी भाषिक महिलांची निवड करण्यात आली.काँग्रेसने सकाळी महापौर निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. याखेरीज महापौर निवडणुकीसाठी भाजपच्या अनगोळच्या प्रभाग 57 च्या नगरसेविका शोभा मायाप्पा सोमणा यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे सोमणा यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली.उपमहापौर पदासाठी नगरसेविका रेश्मा प्रवीण पाटील आणि वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांनी अर्ज दाखल केले होते. निवडणुकीत भातकांडे यांना 4 मते तर पाटील यांना 42 मते पडली. पाटील यांनी भातकांडे यांचा 38 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तीनही नगरसेवकांनी मतदान केले मात्र नगरसेविका भातकांडे यांना चौथेही मत पडले.निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी प्रसार माध्यमांना निवडणूक निकालाची माहिती दिली. सदर माहिती देताना त्यांनी निवडणूक प्रक्रियेपूर्वी सर्व नगरसेवकांचा शपथविधी पार पडल्याचेही सांगितले.दरम्यान, बेळगाव महापौर आणि उपमहापौर निवडणूक प्रक्रियेस वेळेवर उपस्थित न राहणाऱ्या 3 नगरसेवकांना सभागृहाबाहेरच रोखण्यात आल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन छेडले. महापौर आणि उपमहापौर पदाची मुख्य निवडणूक प्रक्रिया दुपारी 3 वाजता प्रारंभ होणार होती. या संदर्भात सर्व नगरसेवकांना कल्पना देण्यात आली होती.मात्र काही कारणास्तव नगरसेविका खुर्शिदा मुल्ला, नगरसेविका झरीन फतेखान व नगरसेवक सोहेल संगोळ्ळी या तिघा जणांना महापालिकेत पोहोचण्यास 3 मिनिटे उशीर झाला. त्यामुळे त्यांना सभागृहात प्रवेश न देता बाहेरच रोखण्यात आले. निवडणुकीसाठी सभागृहात प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या या तीनही नगरसेवकांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन छेडून निषेध नोंदविला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावMayorमहापौरBJPभाजपा