शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा लोकोत्सव शिवस्वराज्य दिन सोहळ्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST2021-01-08T05:19:59+5:302021-01-08T05:19:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी भूमिपुत्रांना सुराज्य दिले, अशा या राजाचा राज्याभिषेक दिन लोकोत्सव व्हावा, यासाठीची ...

Shivswarajya Day celebrations of Shivaraya's work | शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा लोकोत्सव शिवस्वराज्य दिन सोहळ्याचे

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा लोकोत्सव शिवस्वराज्य दिन सोहळ्याचे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी भूमिपुत्रांना सुराज्य दिले, अशा या राजाचा राज्याभिषेक दिन लोकोत्सव व्हावा, यासाठीची चळवळ कोल्हापुरातून सुरु झाली. आता राज्य शासनाने हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने शिवरायांचे कार्यकर्तृत्व, त्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, हा दिवस गावागावात साजरा केला जाईल. याबद्दल शासनाचे करावे तेवढे अभिनंदन कमीच आहे, असे मत कोल्हापुरातील मान्यवर, ज्येष्ठ जाणकार मंडळींनी व इतिहास संशोधकांनी व्यक्त केले.

राज्य शासनाकडून ६ जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी त्याबाबतची घोषणा केली. शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याची सुरुवात कोल्हापुरातून झाली. तो लोकोत्सव व्हावा, यासाठी शिवप्रेमींकडून चळवळ चालवली जाते. पण आता शासनानेच हा निर्णय घेतल्याने राज्यातील प्रत्येक गावात हा दिवस साजरा केला जाणार आहे, याचा मनस्वी आनंद या चळवळीतील मान्यवरांना व कार्यकर्त्यांना आहे.

शिवाजी महाराज यांनी भूमिपुत्रांना सुराज्य दिले. त्यांचा राज्याभिषेक दिन तितक्याच थाटात जनतेने साजरा करावा, अशी आमची इच्छा होती. त्याची चळवळ कोल्हापुरातून सुरु झाली. मुश्रीफ यांनी हा निर्णय घेऊन त्यावर कळसच चढवला आहे. खरंतर हा निर्णय खूप पूर्वी व्हायला हवा होता. आता मात्र गावागावात हा दिवस साजरा होणार, याचा आम्हाला आनंद आहे.

इंद्रजित सावंत (इतिहास संशोधक)

--

शिवाजी महाराजांचा ३३३ वा राज्याभिषेक दिन २००६ साली होता. तेव्हापासून मराठा महासंघाने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. आता कालदर्शिका, दरवर्षी एका ऐतिहासिक घटनेच्या छायाचित्राची प्रसिद्धी, व्याख्यान अशा स्वरुपात त्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयामुळे हा दिवस आता कोल्हापुरातच नव्हे तर राज्यात साजरा होणार आहे, याबद्दल शासनाचे अभिनंदन!

वसंतराव मुळीक (उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ)

--

Web Title: Shivswarajya Day celebrations of Shivaraya's work