शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाही बसची धडक, बालिका ठार, शिरोली-सांगली फाटासमोर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 12:42 IST

शिवशाही बसने मोटरसायकलला पाठीमागुन जोराची धडक दिल्याने मोटरसायकलवरील समृद्धी विकास पाटील (वय.११,रा.चांदोली वसाहत समोर, शिगाव ता.वाळवा,जि. सांगली) बालिका ठार झाली तर दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्दे शिवशाही बसची धडक, बालिका ठार शिरोली-सांगली फाटासमोर अपघात

शिरोली/कोल्हापूर :  शिवशाही बसने मोटरसायकलला पाठीमागुन जोराची धडक दिल्याने मोटरसायकलवरील समृद्धी विकास पाटील (वय.११,रा.चांदोली वसाहत समोर, शिगाव ता.वाळवा,जि. सांगली) बालिका ठार झाली तर दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहेत.

या बालिकेच्या अंगावरून एसटीचे चाक गेल्याने ती ठार झाली तर विकास हंबीरराव पाटील आणि कल्पना विकास पाटील हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास शिरोली-सांगली फाटा शबनम धाब्या समोर झाला.विकास पाटील व त्यांच्या पत्नी कल्पना, मुलगी समृद्धीसह  मोटरसायकलवरून सांगलीहून शिरोली मार्गे शिगावला चालले होते. सकाळी सहाच्या सुमारास शिरोली-सांगली फाटा येथे कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या शिवशाही एसटी बसने मोटरसायकलला पाठीमागुन जोराची धडक दिली. यात विकास पाटील व कल्पना पाटील हे गाडीवरून जोराचे बाजूला फेकले गेले तर समृद्धी ही एसटी बसच्या चाकाखाली सापडली.

या सर्वांना उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल केले, समृद्धीवर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला, तर विकास व कल्पना पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. एसटी बस चालक अनिल दुर्गुळे याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघाताची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.  

टॅग्स :ShivshahiशिवशाहीAccidentअपघातkolhapurकोल्हापूर