शिवसेनेत प्रवेशाचे वृत्त निराधार

By Admin | Updated: March 24, 2017 00:45 IST2017-03-24T00:45:40+5:302017-03-24T00:45:40+5:30

प्रकाश आवाडे : ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातूनच राजकीय वाटचाल

Shivsena's entry news baseless | शिवसेनेत प्रवेशाचे वृत्त निराधार

शिवसेनेत प्रवेशाचे वृत्त निराधार

इचलकरंजी : आवाडेंचा शिवसेनेत प्रवेश हे सोशल मीडियावरून पसरविले जाणारे वृत्त निराधार असल्याचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. ते म्हणाले, आपण मेळाव्यात जाहीर केल्याप्रमाणे जोपर्यंत काँग्रेस नेतृत्वाला आमची गरज वाटत नाही, तोपर्यंत स्वअस्तित्व ठेवून कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून राजकीय वाटचाल सुरू ठेवणार आहे.
काँग्रेस पक्षातील नेतृत्व निष्क्रिय बनल्याची टीका त्यांनी केली. ते म्हणाले, तळागाळात पोहोचून कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यास नेतृत्व असमर्थ ठरले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात सक्रिय राहणार नाही. आवाडेंची आगामी राजकीय वाटचाल कशी राहणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. त्याबाबत खुलासा करताना त्यांनी हे मत मांडले. शिवसेनेत प्रवेश करणार या सोशल मीडियावरील चर्चेला पूर्णविराम देत प्रकाश आवाडे यांनी शिवसेना प्रवेशाचा इन्कार केला. (वार्ताहर)

Web Title: Shivsena's entry news baseless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.