शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विकास प्राधिकरण सचिवपदी शिवराज पाटील : चंद्रकांत पाटील यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 11:59 IST

कोल्हापूर विकास प्राधिकरणाच्या सचिवपदी शिवराज पाटील यांची नियुक्ती आज करण्यात आली.  ८ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रत्यक्ष आपल्या कामकाजात सुरवात करतील. कोल्हापूरच्या विकासाची खऱ्या अर्थाने सुरुवात होईल अशी माहिती  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर विकास प्राधिकरणाच्या सचिवपदी शिवराज पाटील८ फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ४ वाजता स्वीकारतील पदाचा कार्यभार जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच कोल्हापूर विकास प्राधिकरण

कोल्हापूर : कोल्हापूर विकास प्राधिकरणाच्या सचिवपदी शिवराज पाटील यांची नियुक्ती आज करण्यात आली.  ८ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रत्यक्ष आपल्या कामकाजात सुरवात करतील. कोल्हापूरच्या विकासाची खऱ्या अर्थाने सुरुवात होईल अशी माहिती  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.कोल्हापूर जिल्ह्य़ाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी कोल्हापूर विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आली. पुणे, मुंबई येथे ज्या पद्धतीने विकास प्राधिकरणाने शहरांचा विकास साधला त्याच पद्धतीने किंबहुना त्याहून अधिक चांगल्या पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी हे प्राधिकरण काम करणार आहे.

हे प्राधिकरण प्रशासकीय इमारतीतून बसून आपले कामकाज पाहणार असून आता प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात होणार आहे. कोल्हापूर विकास प्राधिकरणाच्या सचिवपदी लातूरचे प्रसिद्ध नगररचनाकार शिवराज पाटील यांची नेमणूक करण्यात आली. आज त्यांच्या नेमणुकीचा आदेशही काढण्यात आला.

८ फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ४ वाजता ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील आणि कामकाजास सुरुवात करतील. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच कोल्हापूर विकास प्राधिकरण स्थापन झाली असून जिल्ह्याच्या विकासाची खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून सुरुवात होईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर