शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शिवनाकवाडी विषबाधा परिस्थिती नियंत्रणात, बहुतांशी रुग्णांना डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 12:17 IST

विषबाधेचा अहवाल दोन दिवसांत, जिल्हाधिकारी येडगे यांची भेट

कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील परिस्थिती नियंत्रणात असून १६२ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून ५२९ रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत; तर काहीजण रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. नेमकी विषबाधा कशापासून झाली, त्याचा अहवाल दोन दिवसांत स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.दरम्यान, शासकीय आरोग्य यंत्रणा दक्ष असून गुरुवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिवनाकवाडी येथे भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली; तसेच आढावा बैठक घेऊन परिस्थितीची माहिती घेतली. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. रुग्णसेवेसाठी कोणत्याही प्रकारची कमतरता पडू दिली जाणार नाही. आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी दिली.शिवनाकवाडी येथे यात्रेत मंगळवारी अन्नातून विषबाधा झाली होती. बुधवारी पहाटे नागरिकांना उलटी, जुलाब होत असल्याने विषबाधा झाल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन रुग्णांना उपचारासाठी युद्धपातळीवर सेवा सुरू होती. रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असली तरी चिंताजनक परिस्थिती नसल्याने व वेळीच योग्य उपचार झाल्याने या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले आहे.

बहुतांशी रुग्णांना डिस्चार्जबुधवारी उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी गुरुवारी ५२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. १५१ रुग्णांवर इचलकरंजी आयजीएम रुग्णालयात तर ११ रुग्णांवर दत्तवाड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रशासन अधिसूचना काढणारशिवनाकवाडीसारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी जिल्ह्यातील यात्रा, जत्रा आणि धार्मिक सोहळ्यांमध्ये योग्य ती दक्षता घेण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.

अहवाल लवकरचआरोग्य विभागाने महाप्रसादातील खीर, गावच्या नळ पाणीपुरवठ्याचे पाणी व रुग्णांचे मल तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे दिले आहेत. त्यामुळे या अहवालाकडे आरोग्य विभागासह ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

आरोग्य विभागाची टीमशिवनाकवाडी विषबाधा घटनेच्या पार्श्वभूमीवर शासकीय आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. औषधसाठ्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी पांडुरंग खटावकर डॉक्टरांची टीम व सर्व यंत्रणा दक्ष आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfood poisoningअन्नातून विषबाधा