शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीतून शिवचरित्राचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 13:43 IST

पारंपरिक वाद्यांचा गजर, ‘शिवरायांचा जयजयकार’, घोड्यांसह लवाजमा, मल्लखांबचे प्रात्यक्षिक, शिवशाहीतील प्रसंगांद्वारे प्रबोधनपर संदेश, अशा उत्साही वातावरणात संयुक्त राजारामपुरी यांच्यावतीने शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. सलग तीन वर्षे राजारामपुरी परिसरातील मंडळांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी करण्यात येते.

ठळक मुद्देमिरवणुकीतून शिवचरित्राचा जागरसंयुक्त राजारामपुरीतर्फे शिवजयंतीनिमित्त मिरवणूक

कोल्हापूर : पारंपरिक वाद्यांचा गजर, ‘शिवरायांचा जयजयकार’, घोड्यांसह लवाजमा, मल्लखांबचे प्रात्यक्षिक, शिवशाहीतील प्रसंगांद्वारे प्रबोधनपर संदेश, अशा उत्साही वातावरणात संयुक्त राजारामपुरी यांच्यावतीने शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. सलग तीन वर्षे राजारामपुरी परिसरातील मंडळांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी करण्यात येते.सोमवारी सकाळी मारुती मंदिर येथे उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावर शिवजन्म सोहळा उत्साहात पार पडला. सायंकाळी सायबर चौक येथे शिवजयंती मिरवणुकीचे उद्घाटन शाहू छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर सरिता मोरे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सतेज पाटील, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक, उद्योजक चंद्रकांत जाधव यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.शिवपालखी, छत्रपती शिवरायांची सिंहासनाधिष्ठीत मूर्ती आणि त्यापुढे घोडे, बाल शिवाजी, मावळ्यांच्या वेशभूषेतील बालचमू अशा लवाजम्यांसह मिरवणुकीची सुरुवात झाली. ‘आम्ही कोल्हापुरी’ ढोल पथकाने मिरवणूक दणाणून सोडली. ‘शिवगाथा’ या सजीव देखाव्यांतून शिवशाहीचे दर्शन घडले. एलइडी स्क्रीनवर शिवरायांची महिती सांगणारी गाणी दाखविण्यात येत होती. तसेच शिवरायांच्या जयजयकारांत मिरवणूक पुढे सरकत होती. मिरवणूक मार्गावर रांगोळ्यांची सजावट करण्यात आली होती.माउली चौक, नऊ नंबर शाळा, कॅसल हॉटेल, जनता बझार चौकामार्गे राजारामपुरी मुख्य रस्त्यावरून मारुती मंदिर येथे मिरवणुकीची सांगता झाली. पारंपरिक वेशभूषेत महिला, युवतींचा लक्षणीय सहभाग होता.

महिलांची उपस्थिती लक्षणीय ...पारंपरिक वेशभूषा व भगवे फेटे परिधान करून महिला, युवतींचा मिरवणुकीत लक्षणीय सहभाग होता. यासह मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांसह मोठ्या संख्येने महिलाही बाहेर पडल्या होत्या.- पारंपरिक वाद्यांचा गजर- शिस्तबद्ध मिरवणूक- महिला व बालकांचा लक्षणीय सहभाग 

 

टॅग्स :Shivjayantiशिवजयंतीkolhapurकोल्हापूर