शिवरायांनी जनतेच्या सार्वभौम स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:01 IST2021-01-13T05:01:29+5:302021-01-13T05:01:29+5:30
मराठा समाजाच्यावतीने कागलमध्ये सत्कार कागल : छत्रपती शिवाजी महाराजांनी सहा जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर जनतेच्या सार्वभौम स्वराज्याची मुहूर्तमेढ ...

शिवरायांनी जनतेच्या सार्वभौम स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली
मराठा समाजाच्यावतीने कागलमध्ये सत्कार
कागल : छत्रपती शिवाजी महाराजांनी सहा जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर जनतेच्या सार्वभौम स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली म्हणून शिवराज्याभिषेक हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा केला जाईल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
सहा जून हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याच्या शासननिर्णयाबद्दल मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार कागल येथील सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आला. मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले की, सहा जूनला ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांवर भगवी गुढी मोठ्या दिमाखात फडकेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, कार्य आणि इतिहास यावर खऱ्या अर्थाने लोकजागर करूया, सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र संघटित करून उत्तुंग कार्य कसे निर्माण करता येते, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला दाखवून दिले आहे.
जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने म्हणाले, या ऐतिहासिक निर्णयाबद्दल लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हा पातळीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार आयोजित केला जाईल.
यावेळी उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, प्रवीण काळबर, विशाल पाटील, आनंदराव पसारे, नाना बरकाळे, दीपक मगर, शशिकांत भालबर, महेश मगर, विलास कालेकर, प्रकाश जाधव, विक्रम चव्हाण, संग्राम लाड, सतीश घाडगे, संदीप बावचे , संजय चव्हाण, अमित पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत सकल मराठा समाजाचे अध्यक्ष नितीन दिंडे यांनी केले. प्रास्ताविक नितीन काळबर यांनी केले. आभार राजू रजपूत यांनी मानले.
मंत्री मुश्रीफ यांचा लाल महालात सत्कार
नितीन दिंडे म्हणाले, ६ जून हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा ग्रामविकास विभागाचा शासननिर्णय ऐतिहासिक आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मंत्री हसन मुश्रीफ यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. त्याबद्दल येत्या २४ जानेवारी २०२१ रोजी पुण्यातील ऐतिहासिक लाल महालामध्ये मंत्री मुश्रीफ यांचा पुण्यातील मराठा समाजाच्यावतीने कृतज्ञतापर सत्कार होणार आहे.
फोटोओळी...... कागल-
सहा जून हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याच्या ग्रामविकास विभागाच्या शासननिर्णयाबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार कागल सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आला. (छाया : संदीप तारळे, गलगले)