जयसिंगपुरात शिवार कोविड सेंटर सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:24 IST2021-05-10T04:24:26+5:302021-05-10T04:24:26+5:30
शैलेश आडके, शैलेश चौगुले यांची माहिती जयसिंगपूर : शिवार सामाजिक विकास व संशोधन संस्था, भरत मेडिकल ट्रस्ट, स्वाभिमानी शेतकरी ...

जयसिंगपुरात शिवार कोविड सेंटर सुरू होणार
शैलेश आडके, शैलेश चौगुले यांची माहिती
जयसिंगपूर : शिवार सामाजिक विकास व संशोधन संस्था, भरत मेडिकल ट्रस्ट, स्वाभिमानी शेतकरी संघटना व जयसिंगपूर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रेरणेतून शिवार कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. हे सेंटर जयसिंगपूर कॉलेजमधील मुलांच्या वसतिगृहात लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती शैलेश आडके व शैलेश चौगुले यांनी दिली.
शिरोळ तालुक्यातील वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन लोकसहभागातून ५० बेडचे कोविड सेंटर सुरू करणार आहे. यामध्ये २० ऑक्सिजनयुक्त बेड असणार आहेत. तरी ज्यांना या सेंटरसाठी मदत करावयाची असल्यास संपर्क साधून मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहनही आडके व चौगुले यांनी केले आहे.